The water problem of Tivere Bhendwadi Shingade family has been solved
आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश
चिपळूण (प्रतिनिधी): तालुक्यातील तिवरे भेंदवाडी येथील धनगर समाजातील शिंगाडे कुटूंबियांचा पाणी प्रश्न अखेर आमदार शेखर निकम यांच्या विशेष प्रयत्नातून सुटला आहे. या योजनेतील विहिरीचे नुकतेच उद्घाटन झाले. यावेळी शिंगाडे कुटूंबियांनी आ. निकम यांचे आभार मानले आहेत. यावेळी येथील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आमदार निकम भारावून गेले.
तिवरे भेंदवाडी धनगर समाजातील शिंगाडे कुटूंबिय १९३५ पासून या ठिकाणी राहत आहेत. परंतु गेली अनेक वर्ष पाण्यापासुन वंचित होते. चिपळूण तालुका धनगर समाजाचे अध्यक्ष शांताराम येडगे, सचिव महादेव खरात, शंकर खरात, लक्ष्मण येडगे यांनी हा प्रश्न आमदार शेखर निकम यांच्याकडे मांडला व पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी केली.
आमदार शेखर निकम यांनी चिपळूण पाणी पुरवठा विभागचे उपअभियंता अविनाश जाधव यांना तिवरे भेंदवाडी शिंगाडे कुटूंबियांचा पाणी प्रश्न सोडविण्याची सुचना केली. यामध्ये टंचाई आराखडयामध्ये सदरील काम समाविष्ट करण्यास सांगितले व मंजूर करुन घेतले. आता काम नुकतेच पूर्ण झाले असून या योजनेचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते तेथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.
यावेळी आ. निकम यांनी आपल्या मनोगत व येथील उर्वरीत समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. खऱ्या अर्थाने आज तुमचे हसरे चेहरे पाहुन मनापासून आनंद झाल्याचे सांगितले. चिपळूण तालुका धनगर समाज संघटनेचे व पाणी पुरवठा विभागाचे आ. निकम यांनी कौतुक केले.
यावेळी तिवरे सरपंच गजानन साळवी , ओवळी सरपंच दिनेश शिंदे,समीर काझी,उत्तमराव शिदे, शंकर खरात,महादेव खरात,नारायण खरात,गंगाराम शिंगाडे,काशिराम शिंगाडे,सखाराम शिंगाडे,राजेद्र शिंगाडे,गणपत शिंगाडे,रामा शिंगाडे,लक्ष्मण शिंगाडे ,ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.











