Aniket Sports Winner of Chiplunat Women’s Kabaddi Tournament
चिपळूण | प्रतिनिधी : स्वराज्य स्पोर्टस् अॅकॅडमीच्यावतीने शहरातील अण्णासाहेब क्रीडा संकुलामध्ये आयोजित एकदिवसीय जिल्हास्तरीय महिला गट कबड्डी स्पर्धेतील अंतिम अटीतटीच्या सामन्यात भरणे- खेड अनिकेत स्पोर्टसने चिपळूण स्वराज्य अ संघावर मात करत जेतेपद पटकावले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून अनिकेत स्पोर्टसची सिध्दी चाळके सर्वोत्कृष्ट खेळाडू हिला गौरवण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. पहिला उपात्य फेरीचा सामना शिवमुद्रा क्रीडा मंडळ – राजापूर (विरुध्द स्वराज्य अ-चिपळूण यांच्यात झाला. स्वराज्य अ संघाने केलेल्या चौफेर खेळाच्या जोरावर हा सामना एकतर्फी जिंकत अंतिम सामन्यात धडक दिली. दुसरा उपांत्य फेरीचा सामना अनिकेत स्पोर्टस् भरणे विरुध्द स्वराज्य ब- चिपळूण या संघात झाला. यात अनिकेत स्पोर्टस् संघाने विजय प्राप्त करत अंतिम सामन्यात मजल मारली. अंतिम सामन्यात सुरुवातीपासून अनिकेत (स्पोर्टस् संघाने चौफर खेळाच्या जोरावर गुणाची आघाडी घेण्यास सुरुवात केली. स्वराज्य अ संघाकडून तितकीच कडवी लढत देण्यात आली. अनिकेत स्पोर्ट्स संघातील सायली शिंदे, सिद्धी चाळके यांच्या आक्रमक खेळाला अन्य खेळाडूंची उत्तम साथ मिळाली. स्वराज्य अ संघाच्या सारा शिंदेंच्या चौफेर खेळामुळे सामना अटीतटीचा झाला. अखेर अनिकेत स्पोर्ट्स संघाने स्वराज्य अ संघावर मात करीत विजेतेपद मिळवले.
सर्वोत्कृष्ठ खेळाडू अनिकेत स्पोर्ट्सची सायली शिंदे, उत्कृष्ट चढाई स्पोर्टस्ची सारा शिंदे यांना गौरवण्यात आले. तसेच तृतीय क्रमांक स्वराज्य स्पोर्टस् ‘ब’, चिपळूण, तर चतुर्थ क्रमांक शिवमुद्रा क्रीडा मंडळ राजापूर यांनी पटकावले.
यावेळी जिल्हा कबड्डी असोएिशनचे अध्यक्ष सचिन कदम, सदानंद जोशी, विकास पवार, राष्ट्रीय खेळाडू श्रध्दा पवार-उदेग, ललिता घरट-वायंगणकर, राणी महाडीक, दीपमाला नाटुस्कर, न्यू हिंद विजय क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मंगेश पवार, निहार कोवळे, श्रध्दा हुंबरे, राखी सकपाळ, अंकिता पवार, ऋतुजा ढगळे, पायल रेडीज, श्वेता शिंदे, श्रध्दा पेंढारी उपस्थित होते.