खेड(प्रतिनिधी)कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना उसळणाऱ्या गर्दीतून प्रवाशांचा आतापासूनच रेटारेटीचाच प्रवास सुरू झाला आहे. शुक्रवारी एलटीटी-तिरुवअनंतपूरम साप्ताहिक उन्हाळी स्पेशलच्या प्रवाशांची ६ तास रखडपट्टी झाल्याने घाम फुटला.
उन्हाळी सुट्टी हंगामासह ‘विकेंड मुळे रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. विशेषतः मुंबईहून गावी येणाऱ्या चाकरमान्यांमुळे लटकंतीचा प्रवास करत गाव गाठण्याची वेळ येवून ठेपली आहे. त्यात विलंबाच्या प्रवासाची भर पडत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. मंगळूर-उधना स्पेशल १ तास २० मिनिटे तर एलटीटी-मडगाव एक्सप्रेस १ तास १५ मिनिटे उशिराने धावल्या सीएसएमटी-मंगळूर एक्सप्रेसलाही १ तासांचा लेटमार्क मिळाला.













