खेड(प्रतिनिधी)मुंबई-गोवा महामार्गावरील मोरवंडेनजीक चुकीच्या बाजूने आलेली दुचाकी एसटीवर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी दुचाकीस्वाराचे नाव समजू शकले नाही.
येथील आगारातील बसचालक पी. डी. माने हे शिव-खेड बसमधून प्रवाशांना घेवून खेडच्या दिशेला येत होते. याचवेळी चुकीच्या बाजूने आलेला दुचाकीस्वार थेट एसटीवरच आदळला. चालकाने बसमधूनच जखमी दुचाकीस्वारास उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली.












