Award given by Gram Panchayat Verambam on the occasion of birth anniversary of Ahilyabai Holkar
गुहागर (प्रतिनिधी): ग्रामपंचायत वेळंबतर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जयंती निमित्त सरपंच समिक्षा बारगोडे व उपसरपंच किशोर मोरे यांच्या हस्ते गावातील प्रियंका घाडे,मंजिरी जाधव या कर्तबगार दोन महिलांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार तसेच वेळंब गावचे एस.के.4 या वाणाच्या हळदीच्या उत्पादनात नावलौकीक मिळवाणारे प्रयोगशिल शेतकरी विजय माळी व कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सरपंच समिक्षा बारगोडे,उपसरपंच श्रीकांत मोरे यांच्या हस्ते प्रियांका घाडे व मंजिरी जाधव यांचा शाल, श्रीफळ व 500/- रूपयाचा धनादेश देवून कर्तबगार महिला म्हणून अहिल्याबाई होळकर पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून वेळंब गावातील प्रगतीशिल शेतकरी विजय माळी यांनी SK-4 या हळदीचा सर्वात मोठा गड्डा उत्पादित करून हा हळदीचा गड्डा SK-4 या हळदीच्या वाणाचे प्रणेते सचिन कारेकर यांनी दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील प्रदर्शनात मांडला व अख्ख्या देशभर वेळंब गावाचे याबाबत नावलौकिक झाल्याबद्दल विजय माळी यांचा तसेच त्यांना व SK-4 हळदीच्या वाणाच्या संशोधनामध्ये सचिन कारेकर यांना सहकार्य करणारे पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांचाही यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रा. पं. सदस्य प्रमोद राणे, सुरेश गंगाराम जाधव,परशुराम घाडे, प्रगती माळी, वैष्णवी घाडे, श्वेताली घाडे, प्रिया निलेश जाधव, जयश्री जाधव, वेळंब गावचे पोलिस पाटिल स्वप्निल बारगोडे,
ग्रा. पं. सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.












