OTAVNE: ओटवणे ग्रा.पंचायत कडून नेहा मयेकर आणि रसिका मेस्त्री अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित.

Neha Mayekar and Rasika Mestri honored with Ahilya Devi Holkar Award from Ottawa Gram Panchayat.

ओटवणे(प्रतिनीधी) शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण प्रत्येक ग्रामपंचायत स्थरावर करण्यात आले असून ओटवणे ग्रामपंचायतीच्या वतीने हा पुरस्कार मायबा प्रोड्यूसर कंपनीच्या गाव प्रतिनीधी व सातुळी बावळाटच्या एम.वी. पी. ऑनर नेहा ज्ञानेश्वर मयेकर यांना देण्यात आला.त्यांनी सामजिक कार्या बरोबरच उमेद च्या माध्यमातून बचत गट तयार करत महिला संघटनाचेहि मोठे काम केले व सक्रीय सहभाग नोंदवला त्यांच्या या योगदानाबद्दल कर्तबगार महिला म्हणून त्यांना अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या बरोबरच ओटवणे ग्रा.कर्मचारी तथा कोरोना च्या काळात गावातली मुलांना एकत्र बसवून अध्ययनाचे काम करत आजही गावातली मुलांना मार्गदर्शक करत गावच्या समाज पयोगी कार्यात योगदान देणाऱ्या रसिका मेस्त्री हीचाही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच आत्माराम ऊर्फ दाजी गावकर, उपसरपंच संतोष कासकर, रविन्द्र म्हापसेकर , ग्रा. सदस्य अस्मिता भगत, ग्रा. सदस्य समिक्षा गावकर, मनाली गावकर आदिंसह अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते.