घरी चक्कर येऊन पडल्याने डोक्याला दुखापत झालेल्या तरुणाचा मृत्यू

A young man died of a head injury due to dizziness at home

रत्नागिरी |  प्रतिनिधी : घरी चक्कर येउन पडलेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.ही घटना मंगळवार 30 मे रोजी मध्यरात्री 2.45 वा.घडली.

सुरज विकास परकर (29,रा.जयगड पेठवाडी,रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.सुरजला 26 मे रोजी रात्री 10 वा.फूफ्फूसाचा व खोकल्याचा त्रास होउन घरी चक्कर आली होती.चक्कर येउन तो जिन्यावरुन खाली पडल्यने त्याच्या डोक्याला मार लागला होता.त्याच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने रत्नाागिरी येथील चिरायु हॉस्पिटलमध्ये दाखल केेले होते.त्याठिकाणी त्याच्या डोक्यावर ऑपरेशन होउन अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.परंतू उपचारांदरम्यान 30 मे रोजी मध्यरात्री सुरजचा मृत्यू झाला.याप्रकरणी अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.