सुप्रसिध्द हार्मोनियम वादक दया मेस्त्री यांचे निधन

ओटवणे । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील सुप्रसिध्द हार्मोनियम वादक दया मधुकर मेस्त्री (५९,चराठा टेंबवाडी) यांचे बुधवारी मध्यरात्री गोवा बांबुळी रुग्णालयात निधन झाले. अनेक दशावतारी, सामाजिक नाटकांसह भजन व किर्तनांना त्यांनी संगीत साथ दिली. तसेच अनेक भजन स्पर्धांना त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे. येथील सुतार कारागीर सिद्धेश मेस्त्री यांचे ते वडील तर कृष्णा आणि नंदा मेस्त्री यांचे ते भाऊ होत.