Vandebharat Express will be welcomed at Ratnagiri Railway Station on Saturday – Sachin Wahalkar.
शनिवार दि.3 जून ला कोकण रेल्वे मार्गावर मडगाव मुंबई दरम्यान वंदेभारत एक्सप्रेस पहिल्यांदाच धावणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी मडगाव येथे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील आणी दु.13.40 ला या गाडीचे रत्नागिरी स्थानकावर आगमन होइल.वंदेभारत ही सेमी हायस्पीड ट्रेन असून आत्मनिर्भर भारत संकल्पनेतील संपूर्ण देशी बनावटीची जलदगती आरामदायी ट्रेन असून आता पर्यंत या श्रेणीतील वीस गाड्या सुरू झाल्या असून या वर्षअखेर पर्यंत ७५ गाड्या देशभरात सुरू होणार आहेत. मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक वंदेभारत हा प्रकल्प आहे.रेल्वे मंत्रालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच अल्पावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात जलदगती ट्रेन सुरू होत आहेत.कोकण रेल्वे वर वंदेभारत सुरू झाल्याने रत्नागिरीतील प्रवास अधिक वेगवान होणार असून याचा फायदा येथील पर्यटन,व इतर व्यवसायांना होणार आहे. या ट्रेनच शनिवारी दु.13.40 ला रत्नागिरीत आगमन होणार असून या गाडीच्या स्वागताला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अस आवाहन करण्यात येत आहे.