मालवण तालुक्यात रोहिणी परुळेकर प्रथम
३२ शाळांचा निकाल १०० टक्के ;
तालुक्याचा दहावीचा एकूण निकाल ९९.५३ टक्के
मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत (दहावी) परीक्षेचा मालवण तालुक्याचा निकाल ९९.५३ टक्के लागला. ३२ प्रशालांचा निकाल १०० टक्के लागला. मालवण तालुक्यात रोझरी इंग्लिश स्कूल मालवणची रोहिणी हरिश परूळेकर हिने (९८.२० ) गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. रोझरी इंग्लिश स्कूल मालवणचीच समृद्धी सतिशकुमार धामापूरकर तर कट्टा हायस्कुल सई ताम्हणकर (९७.६० ) संयुक्त रित्या द्वितीय आचरा न्यू इंग्लिश स्कूलचा वेदांत संतोष गोसावी (९७.२०) याने तृतीय क्रमांक पटकावला.
या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या १०६५ पैकी १०६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ४९८ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी, ४०६ विद्यार्थ्यांनी प्रथम, १३८ विद्यार्थ्यांनी द्वितीय, तर १८ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणी मिळविली.
टोपीवाला हायस्कूल १०० टक्के
प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला. १. धनश्री सखाराम शेटवे (९७.००), २. हितेश आनंद मालंडकर ( ९६.६०), ३. वैभवी विद्याधर मेस्त्री ( ९६.४०). यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
भंडारी हायस्कूल- १०० टक्के
प्रथम- श्रीकांत महादेव घोडके ( ९१.६०), द्वितीय – नताली अंतोन लुद्रीक (८९.०० ), तृतीय- सानिका गुरूदास मालंडकर ( ८८.४० ) यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन सुधीर हेरेकर, अध्यक्ष विजय पाटकर, सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्याध्यापक एच. बी. तिवले यांनी अभिनंदन केले आहे.
कुडाळकर हायस्कूल- १०० टक्के
प्रथम- अंबाजी नागू वलकर (७५.२०), द्वितीय आर्या शंकर किडये ( ७३.६०), तृतीय- सिद्धार्थ हर्षल कांबळे (५६.८० ) यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापिका नंदिनी साटलकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी
अभिनंदन केले.
रेकोबा हायस्कूलचा निकाल ८९.२८ टक्के
प्रशालेतून २८ विद्यार्थी बसले होते पैकी २५ उत्तीर्ण झाले. प्रथम ममता राजेंद्र मेस्त्री (८८.६०), द्वितीय मंचन संजय सुतार (८६.२० ) तृतीय – विभूती खडपे ( ८४.२०). यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, संस्था अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, शालेय समिती अध्यक्ष यांच्यासह शिक्षक, कर्मचान्यांनी अभिनंदन केले आहे.
रोझरी इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के
शाळेतून एकूण ५८ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ४४ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत तर १४ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम – रोहिणी हरिश परुळेकर (९८.२०), द्वितीय समृद्धी सतिशकुमार धामापूरकर (९७.६०), तृतीय दिग्गज दिपक जाधव (९७.००) सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती शाळेचे मुख्याध्यापक फादर दालचिन गोन्सालिस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग या सर्वांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. –
जय गणेश इंग्लिश स्कूल- १०० टक्के
परिक्षेत विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये ३५ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये १४ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. प्रथम तन्वी सचिन दिघे (९६.००), द्वितीय- जुही संतोष सावजी, (९५.००), तृतीय- नेहा श्रीगुरू प्रभू (९४.८०) यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष व सदस्य, मुख्याध्यापिका तेजल बंगुर्लेकर, सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
माध्यमिक विद्यालय, बिळवस १०० टक्के
प्रथम- विरेश सुनिल पालव (८८.८०, द्वितीय- रोहन राजेंद्र घाडी (८२.८० ). – तृतीय- सुश्रुत सुबोध पालव ( ८१.४०) यशस्वी विद्यायांचे संस्थाध्यक्ष सूर्यकांत पालन, सरचिटणीस अशोक पालव, मुख्याध्यापक जयवंत ठाकुर, संस्था पदाधिकारी, सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
कट्टा बराडकर हायस्कूल- १०० टक्के निकाल
वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (संयुक्त) कट्टाचा निकाल १०० टक्के लागला. या प्रशालेतून परिक्षेसाठी ८५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये विशेष श्रेणीमध्ये ४१ विद्यार्थी प्रथम श्रेणी ३२ द्वितीय श्रेणी ११ तर तृतीय श्रेणीमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १. सई विनय ताम्हणकर (९७.६०) २- सिद्धी साबाजी राऊत (९५.२०) ३. निधी राजन गावडे (९२.८०). सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर (निवृत्त), अॅड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर व इतर संचालक, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष अनिल फणसेकर मुख्याध्यापक संजय नाईक यांनी अभिनंदन केले.
चौके माध्यमिक विद्यालय- १०० टक्के
परीक्षेला एकूण ४२ विद्यार्थी बसले होते. विशेष प्राविण्य २२ प्रथम श्रेणी १४ द्वितीय श्रेणी ५ तर तृतीय श्रेणी १ अशा श्रेणींमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म. ता चव्हाण माध्यमिक विद्यालय, चौकेचा निकाल शंभर टक्के लागला. प्रथम रामचंद्र – शिवराम गावडे (९४.८०), द्वितीय-अंजली अनिल शिरतोडे (२०.२०), तृतीय- रिना मानजी गावडे (८९.२०) यशस्वी मुलांचे चौके पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.
आचरा न्यू इंग्लिश स्कूल- १०० टक्के
श्री आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कुल आचरा हायस्कूलने दहावी परीक्षेत उज्वल यश संपादन करत सर्वच्या सर्व ८८ विद्यार्थी पास होत १०० टक्के निकाल लागला. प्रथम वेदांत संतोष गोसावी (९७.२०), द्वितीय प्रितम – रवींद्र कोळगे (९६.४०), तृतीय अदिती जितेंद्र गरड (९४.४०) यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परव मिराशी, सचिव अशोक पाडावे, स्थानिक स्कूल कमेटी अध्यक्षा निलिमा सावंत समिती सदस्य बाबाजी मिसळे, अर्जुन बापर्डेकर, राजन पांगे, संजय पाटील, शंकर मिराशी, तसेच मुख्याध्यापक गोपाळ परब, उप मुख्याध्यापक अंकुश पुटूकडे यांनी अभिनंदन केले आहे.
आचरा इंग्लिश मिडीयमचा निकाल १०० टक्के
धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित माध्यमिक शालांत परीक्षेत नामदेव शंकर कावले इंग्लिश मिडियम स्कुल आचरा चा निकाल १०० टक्के लागला आहे. या प्रशालेतून ३१ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. प्रथम अपेक्षा अशोक – कांदळगावकर (९१.८०), द्वितीय अथर्व गोपाळ कदम (९१.६०). तृतीय सेविया संतातोन फर्नांडीस (९१.२०) यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परव- मिराशी, सचिव अशोक पाडावे, स्थानिक स्कूल कमेटी अध्यक्ष निलेश सरजोशी, खजिनदार परेश सावंत सदस्य मंदार सांबारी, सुरेश गांवकर, दिलीप कावले, मुख्याध्यापिका मायलीन फर्नाडिस यांनी अभिनंदन केले आहे.
मसुरे भरतगड हायस्कूल- १०० टक्के
प्रथम- शुभम रामचंद्र मेस्त्री (८८००) द्वितीय- दत्तराज उत्तम घाडीगावकर (८४.८०), तृतीय- विशाखा प्रदिप परब ( ७३.२०) यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, अध्यक्ष, सेक्रेटरी सावंत, लोकल कमिटी अध्यक्ष, शाळा कमिटी अध्यक्ष, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
मसुरे आर. पी. बागवे हायस्कूल १०० टक्के
प्रथम- वैष्णवी संतोष मेस्त्री (९२.४०), द्वितीय- वेदांत राजाराम परब (९२.२० ). तृतीय- अभिषेक अनिल मेस्त्री (८९.००) संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक, सेक्रेटरी, लोकल कमिटी अध्यक्ष, शाळा समिती अध्यक्ष व संस्था पदाधिकारी, शिक्षक व ग मस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल, मसुरे १०० टक्के
माता काशीबाई महादेव परब चॅरिटेबल ट्रस्ट, मसुरे संचलित भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल, मसुरे या प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे.
विक्रम अनिरुद्ध मेहेंदळे (९२.२०), कु. वैष्णवी आत्माराम परब (८९) तर हृदया राजाराम पाटकर (८३.२०) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष प्रकाश परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, तसेच संस्था पदाधिकारी डॉ. अनिरुद्ध मेहेंदळे, अशोक मसुरकर, बाबाजी भोगले, मुख्याध्यापक किशोर देऊलकर यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्व संस्था पदाधिकारी, स्कूल कमिटी सदस्य, पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
त्रिंबक जनता विद्यामंदिर- १०० टक्के
जनता विद्यामंदिर त्रिंबक हायस्कूल दहावी परीक्षेस बसलेले सर्वच्या सर्व ३२ विद्यार्थी पास होत या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम मनोहर सूर्यकांत घाडीगावकर (९०.८०), द्वितीय सोहम महेंद्र चिंदरकर – (८७.२०), तृतीय- भूषण रविकांत पाताडे (९४.६०) यशस्वी विद्यालयांचे स्कूल कमेटी सदस्य पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक पालक यानी अभिनंदन केले. आहे.
पिरावाडी आचरा रामेश्वर विद्यामंदिर- १०० टक्के
आचरा येथील श्री रामेश्वर विद्यामंदिर आचरा पिरावाडी हायस्कूलचे दहावी परीक्षेस बसलेले सर्वच्या सर्व ५ विद्यार्थी पास होत या शाळेचा निकाल १०० टक्के लागला. प्रथम निमिश मेघश्याम चौगुले (८७) द्वितीय श्रावणी चंद्रशेखर तोडणकर – (८१.६०), तृतीय- हलचली रामचंद्र कुबल (७७.६०) यशस्वी विद्यार्थ्याचि स्कूल कमेटी सदस्य पदाधिकारी मुख्याध्यापक, शिक्षक पालक पानी अभिनंदन केले आहे. –
वायंगणी ज्ञानदीप विद्यालय- १०० टक्के
वायंगणी येथील श्री ज्ञानदीप माध्यमिक विद्यामंदिर वायंगणी हायस्कूलचे दहावी परीक्षेस बसलेले सर्वच्या सर्व १७ विद्यार्थी पास होत या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम युक्ता प्रकाश सावंत (८५.८०), द्वितीय – – सुमित रामदास सावंत ८४.८०, तृतीय काजल प्रदीप गराठे (८२.००) पशस्वी विद्यार्थ्यांचे स्कूल कमिटी सदस्य पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक पालक यांनी अभिनंदन केले आहे.
कांदळगाव ओझर विद्यामंदिर- १०० टक्के
प्रथम श्रेयस संतोष गावकर (७७.००), द्वितीय निष्ठा चंद्रशेखर कांबळी – – (७५.४०), तृतीय हिमेश अनिल लाड (७४.६०) यशस्वी विद्यार्थ्यांचे – मुख्याध्यापक, संस्था अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, शालेय समिती अध्यक्ष यांच्यासह शिक्षक, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
वरसकर विद्यामंदिर, वराड १०० टक्के
सौ. हि. मा. वरसकर विद्यामंदिर व वराङ कला वाणिज्य (सं.) कनिष्ठ महाविद्यालय वराडचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला, विद्यालयातून २५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. या निकालामध्ये विशेष श्रेणी मध्ये १९ प्रथम श्रेणी मध्ये ५ व द्वितीय श्रेणीमध्ये १ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम गौरव यशवंत वराडकर (९४.००), द्वितीय ओंकार वसंत वराडकर (९१.८०), तृतीय- पार्थ सुनिल आळवे (९१.६०) सर्व विद्यात्यांचे वराह ग्रामस्य संघ, मुंबईचे अध्यक्ष अरुण गावडे संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, शालेय समिती चेअरमन आप्पासाहेब परुळेकर व सर्व सदस्य पालक शिक्षक संघ, माता पालक संघ शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, प्रशालेचे माजी मुख्याध्यापक तानाजी पाटील, मुख्याध्यापिका प्रिया मयेकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यानी अभिनंदन केले आहे. –
वडाचापाट शांतादुर्गा हायस्कूल- १०० टक्के
प्रथम- तनिषा सोनू वायंगणकर (९२.६०) द्वितीय- मेघना विजय करावडे (८८.८०), तृतीय- विराज दिपक मांजरेकर (८८.४०), प्रणित शामसुंदर पालव (८८.४०) पशस्वी विद्यार्थ्यांचि भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, शाळा समिती अध्यक्ष सुधीर हेरेकर, संचालक अभिमन्यू कवर मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी अभिनंदन होत आहे.
आडवली हायस्कूल १०० टक्के
आर. ए. यादव हायस्कूलमधून २३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विशेष श्रेणीमध्ये ८. प्रथम श्रेणी १४ तर द्वितीय श्रेणीमध्ये १ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प 9 यम वेदिका हेमंत घाडीगावकर (९२.००), द्वित्तीय साक्षी विद्याचर तुळपुळे ( ९१.८०) तृतीय -अनुष्का अनिल तांडेल (९९.६०) यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई अध्यक्ष, मुख्याध्यापक, पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर १०० टक्के
परीक्षेस २० विद्यार्थी बसले होते. प्रथम सिताराम चंद्रकांत गावडे (८९.४०), द्वितीय निसी सुभाष (८८४०) तृतीय माग्यश्री कमलाकर चव्हाण (८४.४०) यशस्वी विद्यार्थ्याचे संस्था अध्यक्ष – बाबाराव राणे, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
कट्टा वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल १०० टक्के
प्रथम दिना संजय ठोंबरे (५३.००), द्वितीय-लिविया नेपोलियन लोबो (८९.६०), तृतीय-रिया विलास शिरोडकर (८४.८०) ११ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. या सर्व यशस्वी विद्याव्यांचे संस्था विश्वस्त अध्यक्ष व इतर सर्व संस्था पदाधिकान्यांनी विद्यार्थ्याचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिरवंडे हायस्कूलचा निकाल १०० टक्के
त्रिमुर्ती माध्यमिक विद्यालय शिरवडे या प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला. प्रथम- सानिका अजित घाडीगावकर (८७.६०), द्वितीय- राज उत्तम गावकर (८३.२०), तृतीय- समृद्धी मोतीराम दुखंडे व रश्मी दशरथ घाडीगावकर ( ८१.८० ) यशस्वी विद्याथ्यांचे संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. पोईप वर्दम हायस्कूलचा निकाल १०० टक्के
सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के
या माध्यमिक विद्यालयातून ४९ नियमित विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. १९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य २१ विद्यार्थी प्रथम श्रेणी तर उर्वरीत ९ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प प्त केली आहे. प्रशालेत प्रथम ग्रीष्मा प्रदीप धुरी (९१.६०), रोशन मंगेश परब (९१.६०), द्वितीय- सानिका यशवंत पुरी (२०.८०) तृतीय प्रणय प्रल्हाद — माधव (८९.२०) यांनी क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष अनिल कांदकर सचिव विलास माधव, उपाध्यक्ष गोपिनाथ पालव, सर्व विद्यमान संचालक, प्राचार्य मुख्याध्यापक श्री. कुंभार, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पंचक्रोशीतील सर्व पालक यांनी अभिनंदन केले आहे. वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
काळसे हायस्कूलचा निकाल १०० टक्के
परीक्षेस ३० विद्यार्थी बसले होते. प्रथम- प्रणिता प्रभाकर परब ( ९४.४०). द्वितीय–वेदिका अविनाश नाईक (९४), तृतीय- रिया प्रमोद परब (९२.२० )
माळगाव हायस्कूलचा निकाल १०० टक्के
अॅङ गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल, माळगावचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. परिक्षेला १६ विद्यार्थी बसले होते. प्रथम सोहम संतोष भोगले. – (८३.००), द्वितीय- रीना भरत बुट्टे, अभिजीत आनंद कासले. (७५.२०) तृतीय – संजना सुनिल हरकुळकर (७४.००) यशस्वी विद्यार्थ्याचे माळगाव पं. ऐज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय खोत, उपाध्यक्ष रुक्मिणी महाजन, सचिव तातू भोगले, मुख्याध्यापक उदय जोशी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक – यांनी अभिनंदन केले आहे.
ज्ञानदिप विद्यालय हिवाळेचा निकाल १०० टक्के
या प्रशालेतून ११ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. प्रथम – सानिका गणू पवार (८२.४०), द्वितीय जतिन विरेंद्र कदम (८०.४०) तृतीय आशिष प्रकाश – पवार (८०.००), यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञानदिप शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष महेश गावडे, उपाध्यक्ष गणपत धुरी, सचिव चंद्रकांत पवार, मुख्याध्यापक एन. डी. पवार यांनी अभिनंदन केले आहे.
टोपीवाला कन्याशाळेचा दहावीचा निकाल ९३.३३ टक्के
मालवण येथील लक्ष्मीबाई टोपीवाला कन्याशाळेचा दहावीचा निकाल ९३.३३ लागला. प्रशालेमधून १५ विद्यार्थी परीक्षेस बसले प्रथम प्रियांका सुरज पाल (९१.६०), द्वितीय वैश्विका नागेश कदम (८७.००), तृतीय- साबीया सलिम शेख ( ७६.२० ) यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग १०० टक्के –
प्रथम- वैष्णवी भालचंद्र कुबल (८४.६०), द्वितीय- प्रज्ञा भार्गव कांदळगावकर (८२.६०), तृतीय- दिव्या बाबुराव कोहोडावडेकर (८२.२० ) यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
फोटो : 1- रोहिणी परुळेकर
फोटो : 2 – समृद्धी धामापूर
फोटो : 2 – सई ताम्हणकर
फोटो : 3 – वेदांत गोसावी