सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवली मध्ये पूल कॅम्पस ड्राईव्ह चे आयोजन

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवली ट्रेनिंग अँड प्लेसमेंटआणि प्लेसमेंट विभागामार्फत *”जेम्सन्स प्रिसिजन इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड”* या कंपनीसाठी पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. ही भरती *QA इंजिनिअर आणि इंस्पेक्टर* पदासाठी असून, *मेकॅनिकल शाखेतील डिप्लोमा व डिग्रीधारक* उमेदवारा भरती प्रक्रियेसाठी पात्र असतील.

एकूण ३० पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून असून, निवड झालेल्या *डिग्री धारकांना वार्षिक 3.94 लाख आणि डिप्लोमा धारकांना वार्षिक 3.56 लाख* रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे.

हा प्लेसमेंट ड्राईव्ह २७ मे २०२५ रोजी होणार असून. इच्छुक उमेदवारांनी २५ मे २०२५ पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

संस्थापक अध्यक्ष माननीय श्री नारायणरावजी राणे, अध्यक्ष सौ नीलम ताई राणे, अध्यक्ष उपाध्यक्ष डॉ. निलेश राणे, सचिव श्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इच्छुक मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील पदविका व पदवीधारक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. डी एस बाडकर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत करण्यात येत आहे.

 

अधिक माहितीसाठी प्राध्यापक एकनाथ मांजरेकर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर (TP0) ९५४५८९०४०२ यांच्याशी संपर्क साधावा.