वंदे भारत ट्रेनचे ३ जून रोजीचे लोकार्पण रद्द..
*स्वागताचे सर्व कार्यक्रम रद्द,
कणकवली
कोरोमंडल रेल्वेला ओडिसा येथे भीषण अपघात झाल्यामुळे वंदे भारत ट्रेनचा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे मडगाव ते गोवा अशा मार्गावर वनडे 12 ट्रेनचे होणारे स्वागत कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे जे कार्यकर्ते पदाधिकारी कणकवली येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते त्यांनी या कार्यक्रमाच्या रद्द झालेल्या कार्यक्रमाची नोंद घ्यावी अशी माहिती आमदार नितेश राणे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.कोरोमंडल रेल्वेला ओडिसा मालगाडी ला धडक बसून अपघात झाला या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला काही जखमी झाले त्यामुळे वंदे भारत ट्रेनचा लोकार्पणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला आहे . त्यामुळे या रेल्वेच्या स्वागताचे कार्यक्रम रद्द झाले आहेत. वंदे भारत ट्रेनचं सुटणार नसल्यामुळे नवीन वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर भाजपच्या वतीने स्वागताची माहिती दिली जाणार आहे.