शृंगारी उर्दू हायस्कूलचा निकाल ९५.८३ टक्के

पाटपन्हाळे (वार्ताहर ) गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे शृंगारी एज्युकेशन सोसायटी संचलित शृंगारी उर्दू हायस्कूलचा इ. १०वी चा निकाल ९५.८३ टक्के लागला. या शाळेमधून ४८ विदयार्थी परिक्षेस बसले होते. त्यापैकी ४६ विदयार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेमध्ये मध्ये कुमारी मुकादम उमामा मुदस्सीर हिने ९५.०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. कुमार मुसाब मोहम्म्द तल्हा याने ९३.०० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कुमार चौधरी रेहान मुश्ताक हिने ८५.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये १६ प्रथम श्रेणीत १४ व व्दितीय श्रेणीत १५ विदयार्थी तर ०१ विदयार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले.
या यशाबद्दल शृंगारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. अब्बास इस्हाक कारबारी व इतर सर्व पदाधिकारी शाळेच्या तसेच मुख्याध्यापिका व इतर सर्व शिक्षकांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विदयार्थ्याचे अभिनंदन केले.