आरोस येथील श्री देवी माऊलीचा १ डिसेंबर रोजी जत्रौत्सव

सातार्डा I प्रतिनिधी :

आरोस येथील जागृत देवस्थान म्हणजे श्रीदेवी माऊली.हाकेला धावणारी ,नवसाला पावणारी म्हणून या देवतेची सर्वदूर ख्याती आहे.या देवतेचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दिनांक १ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे .यानिमित्त सकाळी मंदिरात धार्मिक कार्यक्रम त्यानंतर केळी ठेवणे, ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार आहेत .तसेच यानिमित्त रात्रौ वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे .तरी सर्व भाविकांनी या जत्रोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन आरोस ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.या मंदिराला करण्यात येणाऱ्या आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर अधिकच खुलून दिसतो.

Sindhudurg