रत्नागिरी l जिल्ह्यातील काही गृह निर्माण संस्थांनी , विकासकांनी आपल्या संस्थेची नोंदणी ४ महिन्याच्या आत संबंधिताला करून देणे बंधनकारक असतानाही अद्याप काही विकासकांनी याबाबत कार्यवाही केली नसल्याचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयास निदर्शनास आले आहे .
या विषयाशी संबंधित असणाऱ्या विकासकांनी नोंदणीकृत केलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची नावे, इमारत व जमिनीचे हस्तांतरण करून घेण्यासाठी व
सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेला योग्य ती कागदपत्रे सादर करण्यासाठी संबंधितांनी सोमवार दिनांक 5 जून रोजी सकाळी ११ वाजता सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयात आपल्या अर्जासोबत व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रासह वेळेत उपस्थित राहावे .
जे विकासक नोंदणी व त्या संदर्भात आवश्यक ती कागदपत्रे देणार नाहीत अथवा टाळाटाळ करतील असे विकासक भा द वि कलम 199 व 200 शिक्षेस पात्र राहतील अशी माहिती सहाय्यक निबंधक सहकारी संस्था रत्नागिरी यांच्या कार्यालयातर्फे परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे .