Chiplun: संत गोरा कुंभार नागरी सह. पतसंस्था खेर्डीचा आर्थिक आलेख उंचावला

Sant Gora Kumbar Nagari Co. Credit institution Kherdi’s financial graph rose

रौप्य महोत्सवी कार्यक्रमात शुभेच्छांचा वर्षाव

संतोष कुळे  |  चिपळूण : संत गोरा कुंभार नागरी सहकारी पतसंस्था खेर्डी चिपळूण या पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रम रविवार दिनांक 4 जून रोजी खेर्डी येथील संत गोरोबाकाका सभागृहामध्ये पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे अध्यक्ष सतीशदादा दरेकर यांची उपस्थित लाभली होती.

कुंभार समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि मार्गदर्शक बा. धों. कुंभार गुरुजी यांच्या विचारातून स्थापन झालेल्या पतसंस्थेने २५ वर्षे पूर्ण केले. त्यांच्या परिश्रमातून आणि समाजातील कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आज संत गोरा कुंभार पतसंस्था प्रगतीकडे वाटचाल करीत आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर, प्रकाश साळवी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर संत गोरोबाकाकांचा फोटो प्रत्येक समाज बांधवांचा घरी असावा यासाठी त्यांचा फोटोचा अनावरण करण्यात आले. त्यानंतर पतसंस्था आणि समाजाच्या पायभरणीसाठी ज्यांनी कष्ट केले त्यांचा सुध्दा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पतसंस्थेच्या वाटचालीचा आलेख कसा उंचावला त्याबाबत प्रास्ताविक करताना प्रकाश साळवी यांनी माहिती दिली. यावेळी सतीश दरेकर आणि इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

जेष्ठ नेते श्री बा धों कुंभार गुरुजी .

पतसंस्था माजी सचिव सोमाशेठ गुडेकर , जिल्हाध्यक्ष . चेअरमन सुभाषजी गुडेकर , कोंकण विभाग कार्याध्यक्ष व चिपळूण तालुकाध्यक्ष प्रकाश साळवी , नवनिर्वाचित चेअरमन तुकाराम साळवी , व्हा. चेअरमन तुकाराम टेरवकर , माजी कर्मचारी सुबोध कुंभार , सचिव सुशिल् काजवे आदीचा सन्मान करण्यात आला.

रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज जनगणना शुभारंभ प्रदेश अध्यक्ष सतिशदादा दरेकर यांच्या हस्ते करण्यात आला .
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश सामाजिक संस्था अध्यक्ष सतिशदादा दरेकर , महिला प्रदेशाध्यक्षा सौ रसिकाताई खेडेकर , कार्याध्यक्ष महेशदादा सायकर , उपाध्यक्ष वसंतराव घोडनदीकर , अनंत कुंभार , पतसंस्था संस्थापक श्री.कुंभार गुरुजी , ह्रदयरोग तज्ञ डॉ सुरेश काळे .सर , डॉ पी व्ही कुंभार , पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सोमवंशी , रायगड जिल्हाध्यक्ष अनंत महाडकर , सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा शिरोडकर सर , ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर कल्याणकर , सरचिटणीस विलास गुडेकर , उपाध्यक्ष शेंदुळकर , कोंकण अध्यक्ष राजूशेठ मंगळूरकर , सरचिटणिस रमाकांत गोरे , उपाध्यक्ष संतोष साळवी , प्रकाश कुंभार , रामदास कुंभार , जिल्हा उपाध्यक्ष मिलिंदशेठ इवलेकर , रत्ना . माजी सभापती मंगेशशेठ साळवी , दापोली तालुकाध्यक्ष विलास जालगांवकर , खेड तालुकाध्यक्ष अनंत पालकर , मंडणगड तालुकाध्यक्ष शंकर म्हाप्रळकर , रत्नागिरी तालुकाध्यक्ष प्रकाशशेठ साळवी , रत्नागिरी महिला जिल्हाध्यक्षा सौ रुक्मीणी कुंभार , चिपळूण तालुकाध्यक्षा सौ ऋतुजा शिरकर , पतसंस्था संचालिका सौ सुमन साळवी , सौ विमल साळवी , गुहागर संपर्क प्रमुख नाना पालकर , प्रमोद साळवी , महेश जामसूतकर , युवा नेते उमेश खैर , सौ दिपा कोलतेकर , चिपळूण उपाध्यक्ष प्रकाश महाराज निवळकर , रविशेठ साळवी , सचिव अमोल पिरदनकर , खजिनदार जनार्दन मालवणकर , पतसंस्था संचालक बबनशेठ पडवेकर , सुनिल टेरवकर , संजय गुडेकर , युवा आघाडी अध्यक्ष महेश पडवेकर , तंटामुक्ती अध्यक्ष अण्णा गुडेकर , सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष रविंद्र शिरकर , तालुकाध्यक्ष अनिल पडवेकर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील टेरवकर आणि सुभाष गुडेकर यांनी केले.