खेड(प्रतिनिधी)रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथून मुंबईकडे जाणारा बारा चाकी टैंकर रस्त्याच्या कडेला उभा करण्याच्या प्रयत्नात कलंडला. ही घटना सोमवार, २ जून रोजी सायंकाळी ५ वाजता आवाशी (खेड) येथे घडली.
आशिष पाटील (मुंबई) हा जयगड येथून टैंकर (एमएच ०४ के ८२२४) घेऊन मुंबईकडे जात होता. टँकरमध्ये राख भरलेली होती. आवाशी येथे महामार्गावर पुढील चाक पंक्चर झाल्याने तो रस्त्याच्या कडेला उभा करण्याच्या प्रयत्नात अंदाज न आल्याने उलटला. सुदैवाने चालकाला इजा झाली नाही.












