हवालदार चंद्रकांत झोरे यांचा प्रोफेशनल स्किल अपग्रेडेशन प्रशिक्षणात द्वितीय..!

कणकवली : कणकवली पोलीस ठाणे अंतर्गत कासार्डे पोलीस दूरक्षेत्र चे हवालदार चंद्रकांत झोरे यांनी नागपूर येथील प्रोफेशनल स्किल अपग्रेडेशन या राज्यस्तरीय प्रशिक्षणात द्वितीय क्रमांक मिळविला. राज्यभरातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नागपूर येथे प्रोफेशनल स्किल अपग्रेडेशन प्रशिक्षण ७ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी राज्यभरातून ३०० तर सिंधुदुर्गातून ६ कर्मचारी सहभागी झाले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर घेण्यात आलेल्या परीक्षेत झोरे यांनी एकूण १५० पैकी १३२ गुण मिळविले. या यशाबद्दल नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रामेश्वर पिंपरेवार यांच्या हस्ते हवालदार झोरे यांना रोख रक्कम पारितोषिक, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.