Ratnagiri: पर्यावरण समतोलासाठी वृक्ष लागवड, संवर्धन जरुरी : प्रमुख जिल्हा न्यायाधीश व्ही. आर. जोशी

Planting and promoting trees is necessary for environmental balance: Chief District Judge V. R. Joshi

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. व्ही. आर. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव श्री. एन. जी. गोसावी यांच्या पुढाकारातून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व लायन्स क्लब रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ५ जून, २०२३ रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा न्यायालयाच्या आवारात वृक्ष लागवड करण्यात आली.

पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि त्याची जोपासना हा एकमेव पर्याय आपल्यासमोर असल्याचे प्रतिपादन मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी श्री. व्ही. आर. जोशी यांनी केले.

याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश – १ श्री. अंबालकर, मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. चौत्रे, दिवाणी न्यायाधीश श्रीमती. सातव, श्री एन एन पाटील.श्रीमती. वणकोरे व इतर सर्व न्यायाधीश वर्ग, जिल्हा सरकारी अभियोक्ता श्री. फणसेकर, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष श्री. धारिया, लायन्स क्लब चे अध्यक्ष श्री. प्रवीण जैन, त्यांचे सहकारी ॲड. शबाना वस्ता तसेच न्यायालयीन कर्मचारी वृंद उपस्थीत होते.