Guhagar : आबलोलीत पर्यावरण दिनी स्वच्छता अभियान

Waterlogged Environment Day Cleanliness Campaign

आबलोली : जागतिक पर्यावरण दिनी गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांच्या वतीने मुख्य बाजारपेठ,वाडी जोड रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानात ठिकठिकाणी प्लास्टिकचे संकलन करण्यात आले. तसेच पालापाचोळा जाळण्यात आला. प्लास्टिक न वापरणे विषयी जनजागृती करण्यात आली. उपस्थित ग्रामस्थांना पर्यावरण रक्षणाची व स्वच्छतेची प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी सरपंच वैष्णवी नेटके, उपसरपंच अक्षय पागडे, ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश बाईत,उमेश पवार, शैला पालशेतकर, पायल गोणबरे, वृषाली वैद्य, ग्रामसेवक बी.बी. सूर्यवंशी यांसह गावातील वाड्यांचे वाडी प्रमुख, व्यापारी बांधव, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. ग्रामसेवक बी.बी. सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.