कणकवली पोलिसांची कारवाई ; दारुवर देखील कारवाई
कणकवली I मयुर ठाकूर : कणकवली पोलिसांनी मंगळवारी रात्री पटवर्धन चौकात नाकाबंदी करत ऑपरेशन ऑलआऊट मोहिम राबवली. यावेळी दुचाकी आणि इतर वाहन चालकांकडून नियमभंग प्रकरणी सुमारे १६ वाहनांवर ९ हजाराचा दंड वसूल केला.
All-out operation in Kankavli; 9 thousand fine...!
कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, वाहतुक पोलिस हवालदार विनोद चव्हाण, सुप्रिया भागवत, आशा चव्हाण, होमगार्ड श्री. पाटील आदीनीही कारवाई केली.
लायसन नसताना गाडी चालवणे, मोबाईलवर संभाषण करणे, गाडीचे कागदपत्र नसणे, इन्शुरन्स अशा अनेक प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. दर महिन्याला पोलिस ऑपरेशन ऑलआऊट मोहिम राबवतात. यावेळच्या कारवाईवेळी बेकायदा दारुही पकडण्यात आल्याचे हवालदार विनोद चव्हाण यांनी सांगितले.