२२ हजार लाभार्थ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड…!

Google search engine
Google search engine

कणकवली : कणकवली तालुक्यातील किसान क्रेडिट कार्ड लाभार्थ्यांना सर्व बँकांनी पुरेसे सहकार्य करा. बँकांमधून किसान क्रेडिट कार्ड लाभार्थ्यांना वेळेत द्या. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या बँकांना पोच केल्या आहेत.

त्यानुसार तात्काळ कार्यवाही करायची आहे. तालुक्यातील सुमारे २२ हजार ६९७ किसान क्रेडिट कार्ड लाभार्थी पात्र ठरले असून हे लाभार्थी या लाभापासून वंचित राहता नये याची काळजी घ्या असे अशा सूचना कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिल्या. कणकवली तहसीलदार कार्यालयात आयोजित बँकांच्या अधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी व्हि.वाय. मुळे व तालुक्यातील किसान क्रेडिट कार्ड जमा असलेल्या बँकांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तहसीलदार श्री. पवार यांनी या बँक अधिकाऱ्यांची कृषी विभागासोबत संयुक्त बैठक घेत या सूचना दिल्या. कणकवली तालुक्यातील २२ हजार ६९७ किसान क्रेडिट कार्डधारक असून या पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधितांना देण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड प्रदान करण्या चे की उद्दिष्ट १०० टक्के देण्यात आले आहे. कृषी विभागाने याकरिता समन्वयक म्हणून काम करावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती श्री. पवार यांनी दिली.

22 thousand beneficiaries will get Kisan Credit Card...!

जिल्ह्यात आचारसंहिता सुरू असल्याने याबाबत किसान क्रेडिट कार्ड वाटपा करिता शिबिरे न घेता संबंधित पात्र लाभार्थ्यांपर्य ंत कृषी विभागाने ही माहिती पोचून संबंधित बँकांमध्ये सात बारा, आठ अ व त्या अनुषंगाने कागदपत्र द्या व किसान क्रेडिट कार्ड स्वीकारा असे आवाहन यावेळी करण्यात आले. “किसान भागीदारी, प्राथमिकता हमारी ” या स्लोगन खाली ही मोहीम राबवण्याच्या सूचना शासन स्तरावरून देण्यात आल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. कणकवली तालुक्यातील २० बँकांमधून तालुक्यातील २२ हजार ६९७ किसान क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहेत असेही यावेळी श्री पवार यांनी सांगितले. किसान क्रेडिट कार्ड देण्याबाबत बँकांनी शेतकऱ्यांना पुरेपूर सहकार्य करा. किसान क्रेडिट कार्ड च्या याद्या तलाठी, ग्रामसेवक व संबंधित बँकेच्या शाखेला तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून मेलवर पाठविण्यात आल्या आहेत. त्यानुसार याबाबतची तातडीने कार्यवाही अपेक्षित आहे. प्राधान्यक्रम देत हे काम मार्गी लावा अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.