रत्नागिरी ः प्रतिनिधी : गुहागर येथे शेतात काम करणार्या प्रौढाला सर्पदंश झाल्याने त्याला अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नितिन सिताराम दसम (40,रा.अडूर गुहागर,रत्नागिरी) असे सर्पदंश झालेल्या प्रौढाचे नाव आहे.गुरुवार 8 जून रोजी सकाळी 8 वा.सुमारास नितिन आपल्या शेतात काम करत होता.त्यावेळी त्याला फुरसं नावाच्या सापाने दंश केला.काही वेळाने त्याला अस्वस्थ वाटू लागल्यावर त्याच्या नातेवाईकांनी नितिनला प्रथम गुहागर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेउन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले.याबाबात जिल्हा शासकिय रुग्णालयातील पोलिस चौकित नोंद करण्यात आली आहे.