मालवण भाजपची जोरदार घोषणाबाजी

 

प्रदेश भाजपच्या वतीने कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदी निलेश राणे यांच्या नियुक्तीचा मालवणात भाजप कार्यालयात आंनद

मालवण | प्रतिनिधी : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने लोकसभा व विधानसभा मतदारसंघ प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदी माजी खासदार निलेश राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मालवण तालुका भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मालवण कार्यालयात एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत आंनद साजरा केला.

दरम्यान, भाजप युतीला अपेक्षित असलेले यश मालवण कुडाळ मतदारसंघात निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मिळणारच. असा विश्वास सर्वांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहरप्रभारी विजय केनवडेकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, पूजा सरकारे, माजी उपसभापती राजू परुळेकर, माजी वित्त व बांधकम सभापती संतोष साटविलकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, संचालक आबा हडकर, अमित गावडे, महेश गांवकर, संतोष पालव, संतोष गांवकर, युवमोर्चा अध्यक्ष मंदार लुडबे, शहराध्यक्ष ललित चव्हाण, राजन माणगांवकर, प्रमोद करलकर, विजय निकम, राम चोपडेकर, निलेश खोत, सौरभ ताम्हणकर, भाई मांजरेकर, निषय पालेकर, निखिल घोगळे, बाबू कासवकर, निनाद बादेकर, राज कांदळकर, विरेश पवार, ओंकार लुडबे यासह अन्य उपस्थित होते.