खेड (प्रतिनिधी ) महाराष्ट्र तर्फे देण्यात येणारा सार्वजनिक बांधकाम विभागातील गुणवंत पुरस्काराचे मानकरी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागातील कनिष्ठ अभियंता निलेश गोपाळ पावसे यांना
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडलेल्या कार्यक्रमात गौरवण्यात आले.
येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेले निलेश पावसे हे आपल्या कर्तव्य तत्परतेमुळे परिचित आहेत त्यामुळे त्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण अंतर्गत येणाऱ्या खेड उपविभागाचे गुणवंत कर्मचारी म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाने गौरविले आहे त्यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल येथील कार्यालयाच्या अभियंत्या श्रीमती जटाळ यांच्या
हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.