संजय आग्रे यांची बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड..!

Google search engine
Google search engine

बाळासाहेबांची शिवसेना पक्ष जोमाने वाढविण्यासाठी प्रयत्न करणार – संजय आग्रे

कणकवली I मयुर ठाकूर : कणकवली : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी संजय आग्रे यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांच्या आदेशानुसार आग्रे यांची जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली. तर महिला जिल्हाप्रमुख पदी कुडाळ येथील वर्षा कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपजिल्हाप्रमुख पदी महिंद्रा सावंत, शेखर राणे, विश्राम रावराणे यांना नियुक्ती दिली असून सावंतवाडी भागाच्या जिल्हाप्रमुखांची निवड लवकरच करणार असल्याची माहिती पक्षाचे नेते ब्रिगेडियर माजी खा सुधीर सावंत यांनी दिली. मुंबई येथील सह्याद्री बंगल्यावर उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, रत्न सिंधू योजना सदस्य किरण सामंत, माजी खा. सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

या निमित्ताने कणकवली येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नूतन जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी त्यांच्यासमवेत माजी जि. प. सदस्य संदेश पटेल, नूतन तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, भास्कर राणे, सुनील पारकर, शेखर राणे आदी उपस्थित होते.

संजय आग्रे यांच्याकडे कणकवली देवगड वैभववाडी कुडाळ मालवण या ५ तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. माजी जि प सदस्य असलेले संजय आग्रे हे प्रसिद्ध उद्योगपती असून राजकारणासोबत समाजकारण, शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असतात. सहकार क्षेत्रात त्यांचा मोठा बोलबाला आहे. अडीअडचणीला नेहमी हक्काने मदत मिळणारच ही संजय आग्रे यांची जनमाणसात ओळख आहे. शांत व संयमी स्वभावाचे आग्रे हे मितभाषी असले तरी जनतेची कामे करण्यात नेहमीच पुढे असतात. आग्रे यांच्या रूपाने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला संघटन कौशल्य असलेले दमदार नेतृत्व लाभले आहे.

यावेळी संजय आंग्रे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, मालवण कुडाळ विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, विधानसभा क्षेत्र प्रमुख (कणकवली, देवगड, वैभववाडी) संदेश पांडुरंग सावंत (पटेल), उपजिल्हाप्रमुख महिंद्रा सावंत, शेखर राणे, विश्राम रावराणे यांची नावे जाहीर करण्यात आली.

तालुका प्रमुख :- कुडाळ – योगेश उर्फ बंटी तुळसकर, कणकवली – (जानवली. फोंडा, हरकुळ, कलमठ, कळसुली, नाटळ, कणकवली शहर) भुषण परुळेकर ,(कासार्डे खारेपाटण ) शरद वायंगणकर. देवगड : – (शिरगाव, फणसगांव पोंभूर्ले किंजवडे, देवगड शहर ) – विलास साळसकर, (मिठबाव, पडेल. पुरळ, जामसांडे शहर) – अमोल लोके, मालवण :- (आचरा, आठवली, मसुरे, सुकळवाड) – महेश राणे, (देवबाग, कट्टा, पेंडुर, मालवण शहर) – विश्वास गावकर, वैभववाडी : संभाजी रावराणे कणकवली तालुका समन्वयक – सुनिल दिगंबर पारकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती नूतन जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी दिली.