महाडिबीटी पोर्टलवर नवीन शिष्यवृती अर्ज भरणे व मागील अर्जांचे नूतनीकरणासाठी ‘डीबीजे’ तर्फे जाहीर आवाहन

Public appeal by ‘DBJ’ for filling new scholarship applications and renewal of previous applications on MahaDBT portal

चिपळूण  प्रतिनिधी  : डीबीजे महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास, खुल्या प्रवर्गातील (SC, ST, VJNT, OBC, SBC, Gen.) विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, शैक्षणीक वर्ष सन २०२२-२३ या वर्षासाठी भारत सरकार शिष्यवृती (SCHOLARSHIP), शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क (FREESHIP), राजषी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृती योजना (EBC- Gen.), डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना (Hosteller), माजी सैनिकांच्या पाल्याना आर्थिक सहाय्य योजना (Ex Serviceman), दिव्यांग शिष्यवृती (Disability), अल्पसंख्याक शिष्यवृती (Minority) इ. तसेच मागील वर्षी ऑनलाइन भरलेल्या अर्जांचे नूतनीकरण करण्यासाठी महाडीबीटी या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३०/०६/२०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृतीचे ऑनलाइन अर्ज https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अचूक भरून ऑनलाइन अर्ज व संबधित कागदपत्रे पडताळणी (Verification/scrutiny) करण्याकरिता डीबीजे महाविद्यालयातील कार्यालयात प्रताप जाधव व सौ. सई सोमण यांच्याकडे लवकरात लवकर जमा करावेत. शिष्यवृतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२३ आहे. यानंतर सदर पोर्टल बंद झाल्यास तसेच शिष्यवृती न मिळाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्याची राहील. तरी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील कार्यालयात संपर्क साधून वरील शिष्यवृत्त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. माधव बापट डीबीजे महाविद्यालय, चिपळूण व रजिस्ट्रार अनिल कलकुटकी यांनी केले आहे.