New Tehsildar of Mandangad Taluka Shri. Tanaji Sejal accepted the charge
मंडणगड प्रतिनिधी दि. 10- मंडणगड तालुक्याचे मावळते तहसिलदार श्री.विजय सुर्यवंशी यांची बढतीवर बदली झाल्याने त्यांच्या जागेवर नियुक्त झालेल्या श्री. तानाजी सेजाळ यांनी 9 जुन 2023 रोजी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. प्रशासकीय सेवेचा दीर्घ अनुभव असलेल्या महसुल खात्यात तलाठी या पदापासून आपल्या सेवेस सुरुवात केल्याने ग्रामिण व दुर्गम भागातील जनतेच्या समस्यांची त्यांनी उत्तम जाण आहे. महसुल कार्यालयातील श्री.घोरपडे श्री. गोडघासे, श्री. बिछेवार, मयूर पोळ, सर्कल प्रकाश साळवी या कर्मचाऱ्यांसह तालुकावासीयांनी त्यांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.
फोटो ओळी- मंडणगड चे नवीन तहसिलदार तानाजी सेजाळ यांचे स्वागत करताना तहसिल कार्यालयातील कर्मचारी श्री.घोरपडे श्री. गोडघासे, श्री. बिछेवार, मयूर पोळ, सर्कल प्रकाश साळवी