बिबट्याच्या हल्ल्यात पाडी ठार : करुळ येथील घटना

वैभववाडी l प्रतिनिधी :    बिबट्याच्या हल्ल्यात नामदेव बळीराम डकरे रा. करूळ गावठण यांची पाडी मृत्युमुखी पडली आहे. बिबट्याच्या दहशतीने गावात भीतीचे वातावरण पसरले आहेत.

करूळ गावठण येथील भेंडीच्या जंगलात बिबट्याने पाडीवर हल्ला केला. या हल्यात पाडी मृत्यूमुखी पडली. या घटनेची माहिती मालक नामदेव बळीराम डकरे यांनी वन विभागाला दिली. वनविभागाचे वनपाल हरी लाड व वनरक्षक अनिल राख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे.