आ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा

मोहिनी मडगांवकर यांची सावंतवाडी पोलीस निरीक्षकांकडे मागणी

सावंतवाडी । प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा आदरणीय चित्राताई वाघ यांच्याबाबत आक्षेपार्ह बदनामीकारक मजकूर अपलोड केला असून त्यांना बदनाम करत त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचे काम त्यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर आ. जितेंद्र आव्हाड यांनी महिलांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या सावंतवाडी शहर अध्यक्षा तथा सौ. मोहिनी मडगांवकर यांनी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्याकडे निवेदन देत मागणी केली आहे. यावेळी महिला पदाधिकारी मेघना साळगांवकर, मिसबा शेख, साक्षी गवस, मेघा भोगटे आदी उपस्थित होत्या.

Sindhudurg