सेनेला भिरवंडे-गांधीनगरात भगदाड;ग्रामपंचायत सदस्यांसह व शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल

सेनेच्या सतीश सावंत यांना धक्क्यावर धक्के

जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांची यशस्वी खेळी

कणकवली I मयुर ठाकूर : भिरवंडे-गांधीनगर येथील असंख्य शिवसैनिकांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.शिवसेना पक्षाचे प्रभुत्व असलेल्या या गावात शिवसेनेचे पुरते पानिपत झाले. प्रमुख पदाधिकारी ग्रामपंचायतचे काही सदस्य, सरपंच यांनी यापूर्वीच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असल्याने उरले-सुरले शिवसैनिकही आणि ग्रामपंचायत सदस्य भाजपात दाखल झाल्याने भिवंडी-गांधीनगर येथे शिवसेनेला फार मोठे भगदाड पडले आहे.
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्याबरोबर गांधीनगर व दादांचीवाडी, भिरवंडे खलांतर येथील ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा यातील काही सदस्यांनी सतीश सावंत यांच्या निवासस्थानी उपस्थिती लावली होती. त्यामुळे भाजपला धक्का बसल्याचे बोलले जात होते. परंतु ते कार्यकर्ते पुन्हा भाजपामध्ये दाखल झाले. आमदार नितेश राणे यांनी या सदस्यांचे स्वागत केल्याचे भाजपा कडून सांगण्यात आले. ग्रामपंचायत गांधीनगर, दादांचीवाडी, खरंलवाडी गावामध्ये जाऊन भाजपामध्ये भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी भाजपा पक्षात स्वागत केले. गांधीनगरच्या कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी प्रसन्ना प्रशांत सावंत, ग्रामपंचायत सदस्य, प्रशांत मधुसूदन सावंत, मोर मुकुंद सावंत, मनीषा मनोहर सावंत, बाबाजी गोविंद सावंत, मधुसूदन सावंत, सुषमा सावंत, नीलकंठ सावंत, नीलम नीलकंठ सावंत, माजी ग्रामपंचायत, शालिनी सावंत, विजया सावंत, विहान सावंत, वैशाली सावंत, अमित सावंत, मिलिंद सावंत, सुवर्णा सावंत, मंजुषा बोभाटे, आकांक्षा सावंत, सदस्य सह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी आम. नितेश राणे, संदेश उर्फ गोट्या सावंत, गांधीनगर सरपंच अनंत बोभाटे, मिलिंद बोभाटे आदि उपस्थित होते.