रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सशी संलग्नता

रत्नागिरी : शहर आणी परिसरातील व्यापाऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने लढणाऱ्या रत्नागिरी शहर व्यापारी महसंघाला आज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या राज्यपातळी वर व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चेंबर ऑफ कॉमर्स ची संलग्नता देण्यात आली. याची अधिकृत घोषणा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी केली. ललित गांधी हे आज रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी त्यांनी रत्नागिरी व्यापारी महसंघाची भेट घेत त्यांच्याशी वार्तालाप केला. याप्रसंगी रत्नागिरी शहर व्यापारी महसंघाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. व्यापाऱ्यांच्या विविध अडचणी आणी त्यांची सोडवणूक चेंबर ऑफ कॉमर्स च्या माध्यमातून कशा पद्धतीने केली जाते याबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली. यापुढे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ आपले काम करेल असा विश्वास महासंघाकडून व्यक्त करण्यात आला.