रत्नागिरीच्या सानिका कुमारी उर्फ सानिका नागवेकर हीचा मिस महाराष्ट्र म्हणून किताब देण्यात आला

रत्नागिरी | प्रतिनिधि: टीम झेनिथ इंडिया संस्थेतर्फे महाराष्ट्रातील उदयोन्मुख मुलींना वेगवेगळ्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून वीर सावरकर नाट्यगृह ,रत्नागिरी येथे मिस महाराष्ट्र २०२३ सोंदर्या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य मधून नंदुरबार, अकोला , नागपूर इत्यादी जिल्हामधून २० पेक्षा जास्त मूलिनी सहभाग घेतला होता.त्यामध्ये पी बी अंभ्यकर आणि आर बि कुलकर्णी ज्युनिअर कॉलेज (पटवर्धन कॉलेज ) ची १२ वी मधून नुकतीच उत्तीर्ण झालेली सानिका नागवेकर यांची मिस महाराष्ट्र म्हणून निवड करण्यात आली. तसेच द्वितीय रनरप म्हणून रत्नागिरीची सानिका चव्हाण व तृतीय रनरप खुशी शर्मा नागपूर ह्याची निवड करण्यात आली. त्यावेळेस उपस्थित मान्यवरांनी निवड झालेल्या स्पर्धकांवर शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. तदप्रसंगी छाया फोटो स्टुडिओचे अमर सेठ, अमेय मसुरकर, दादा सुर्वे , आयोजक रुपेश चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते