आम. नितेश राणेंचा एक फोन आणि ठाकर समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात….!

Google search engine
Google search engine

कणकवली I मयुर ठाकूर: सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे शिष्टमंडळ आज सकाळी आमदार नितेश राणे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर बांधवांना जात पडताळणी ठाणे उपआयुक्त यांच्याकडून त्रास होत असल्याची तक्रार आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर बांधवांनी केली होती.

Common. A phone call from Nitesh Rane and the Thacker community started getting caste certificate….!

श्री पावरा हे जात वैधता प्रमाणपत्र देत नसून कोर्टात धाव घेतल्यावर तेच जात वैधता प्रमाणपत्र मिळत होते. या धर्तीवर नाहक त्रास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाज बांधवांना होत होता. सकाळीच आमदार नितेश राणे यांनी जात पडताळणी उप आयुक्त पावरा यांची झडती घेतली असून त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले होते आणि या प्रकरणांमध्ये मी स्वतःहून लक्ष घालणार अशा प्रकारची ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजातील समाज बांधवांना दिली होती. या घटनेनंतर लगेचच अवघ्या काही तासांमध्ये दीपेश दीपक सिंगनाथ आणि दीप्ती दीपक सिंगनाथ यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले असून आमदार नितेश राणे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजामध्ये आनंदाचं वातावरण असून सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज सिंधुदुर्ग च्या वतीने आमदार नितेश राणे यांचे आभार मानले जात आहेत.