शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक’ येथे राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांची पुण्यतिथी साजरी

 

लांजा (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक’ येथे सोमवार दिनांक १२ जून रोजी
राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम सामूहिकपणे ध्येर्यमंत्र म्हणण्यात आला. यानंतर डॉ.श्री. समीर घोरपडे आपले विचार व्यक्त करताना म्हणाले ,’जगात अशी एकच माता होऊन गेली की तिने स्वराज्याच्या दोन दोन छत्रपतींचे संगोपन केले.
शहाजीराजे कर्नाटक मधील कारभार बघत असताना महाराष्ट्राकडील कारभार धाडसाने जिजाऊ मॉंसाहेबांनी सांभाळला. त्याचबरोबर सईबाईंच्या निधनानंतर छोट्या शंभूराजांचा देखील त्यांनी तितक्याच समर्थपणे सांभाळ केला.
छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर असताना सिद्धी जोहरचा वेढा पडला होता.
तो वेढा फोडण्यासाठी वयाच्या साठाव्या वर्षी जिजाऊनी हातात शस्त्र घेतली आणि प्रत्यक्ष रणांगणावर जाण्याची त्यांनी तयारी केली होती.
हाच विचार प्रत्येकाने आज लक्षात घेण्यासारखा आहे आपल्याला आपल्या राष्ट्राचे, धर्माचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने सज्ज होणे गरजेचे आहे.’
शेवटी सामूहिक शिवसुर्यहृदय मंत्र म्हणून झाल्यावर सगळ्यांनी जिजाऊ मातेच्या प्रतिमेची पूजा केली.बजरंग दल आणि श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते उपस्थित होते.