भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर…!

‌कुडाळ येथे समन्वय बैठक; कणकवलीत जिल्‍हा संघटनेचा आढावा…!

कणकवली : भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या २५ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. यात रात्री त्‍यांचा कुडाळ येथील हॉटेल लेमनग्रास येथे मुक्‍काम असणार आहे. २६ रोजी सकाळी नऊ वाजता श्री.बावनकुळे यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे भाजपची समन्वय बैठक होणार आहे.

BJP state president Chandrashekhar Bawankule on Sindhudurg tour today...!

तर सकाळी दहा वाजता रविकमल सभागृह कुडाळ येथे ‘संविधान दिवस’ या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. दुपारी ११ वाजता कणकवली तालुक्‍यातील वागदे गणेश मंदिर ते पटवर्धन चाैक आणि तेथून वृंदावन हॉल पर्यंत मोटारसायकल रॅली निघणार आहे. तर ११.४५ वाजता वृंदावन हॉल येथे जिल्‍हा संघटनात्मक बैठक होणार आहे. दुपारी दीड वाजता श्री.बावनकुळे हे हॉटेल नीलम्स कंट्रीसाईड येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधणार असल्‍याची माहिती भाजपकडून आज देण्यात आली.