जिल्हास्तरीय तायक्वाँदो स्पर्धेत रत्नागिरीतील खेळाडूंची बाजी

 

रत्नागिरी येथे आयोजित, जिल्हा अजिंक्यपद क्योरोगी व पुमसे तायक्वॉंदो स्पर्धेत रत्नागिरीतील तायक्वांदो खेळाडूंनी
बाजी मारली.
तायक्वॉंदो असोसिशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट असोसिएशन सहकार्याने
एस.आर.के तायक्वॉंदो क्लबने मारुती मंदिर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे ही अजिंक्यपद स्पर्धा घेतली. 17,18,19, जून रोजी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत रत्नागिरीतील क्लबच्या खेळाडूंनी विशेष गटापासून वरिष्ठ गटापर्यंत २२ सुवर्ण, ११ रौप्य आणि १४ कांस्य पदक जिंकली. रत्नागिरीचे सुवर्ण पदक क्योरोगी (फाईट) विजेते पुढीलप्रमाणे.
१) सब ज्युनिअर – सुरभी राजेंद्र पाटील, स्वर्णिका रसाळ, स्वरा साखळकर, आराध्य सावंत, मृण्मयी वायंगणकर, विधान कांबळे, रूद्र शिंदे, आभा सावंत, भक्ती डोळे,

२) कॅडेट – गौरी विलणकर, सार्थक चव्हाण, मृदुला पाटील,

३) ज्युनियर – त्रिशा मयेकर, गायत्री शेलार, आदिष्टी काळे, ऋतिक तांबे, ओम अपराज, कृपा मोरये,

४) सिनियर – वेदांत चव्हाण, अमेय सावंत, सई सावंत,सुजल सोळंके यांनी सुवर्णमयी कामगिरी करत राज्यस्तरावर आपल नाव निश्चित केलं.
या अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक विजेते पुढीलप्रमाणे –
१) सब ज्युनियर – बरखा सर्फराज संदे, रावी वारंग, समर्थ जोशी, केतकी चीगरे, साईराज चव्हाण, त्रिशा लिंगायत, राधा रेवाळे, दीक्षा सिंग
कॅडेट – पार्थ कांबळे, आनंद भोसले
३) सिनियर – प्रसन्ना गावडे यांनी मिळवलं.

या स्पर्धेत कांस्य पदक विजेते पुढीलप्रमाणे.
१) सब ज्युनियर – उर्वी कळंबटे, रूद्र शिवदे, राजवीर सावंत, चैतन्य कडू, पार्थ वैशंपायन, साकेत पारकर, यश भागवत, वेदिका कडू.
२) कॅडेट – स्मित कीर, तुषार कोळेकर, सान्वी मयेकर
३) ज्युनियर – देवन सुपल, आर्या शेणवी,
४) सिनियर – समर्था बने

याच अजिंक्यपद स्पर्धेत खेळात नव्याने वाटचाल करणाऱ्या लहान खेळाडूना विशेष गटात संधी देण्यात आली. याही गटात मुलांनी आपल्या क्रीडा गुणांची चुणूक दाखवली.
विशेष गट – सुवर्ण – प्रशिक कांबळे, राधा रेवाळे, वेदिका पवार.
रौप्य पदक – सार्थक जोशी, ओम रेवाळे, सोरेन प्रताप.
कांस्य पदक विजेते – रावी वारंग, राजवीर सावंत, पार्थ वैशंपायन, शिवांश वर्मा,
तीर्था लिंगायत यांनी हे यश मिळवल.
या अजिंक्यपद स्पर्धेत पुमसे प्रकारात फ्री स्टाईलमध्ये आर्या शिवदे रौप्य पदक
सांघिक रौप्य पदक – स्वरा साखळकर, केतकी चिगरे,मृण्मयी वायंगणकर
फ्री स्टाईल पुमसे कांस्य पदक स्वरा साखळकर
वैयक्तिक पुमसे प्रकारातही स्वरा साखळकर हिला कांस्य पदक मिळालं.
या स्पर्धेत हे घवघवीत यश मिळवलेल्या या सर्व स्पर्धकांचे युवा सेनेचे तालुका प्रमुख तुषार साळवी तसचं मंत्री सामंत यांचे सहायक दीपक मोरे यांनी भरभरून कौतुक केले.
रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेशराव कररा् ,सचिव लक्ष्मण.के कररा्,उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे,खजिनदार शशांक घडशी तसचं सर्व पालकवर्ग यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सर्व खेळाडूना शाहरुख शेख, प्रशांत मकवाना, मिलिंद भागवत यांचं मार्गदर्शन लाभल. या स्पर्धेला महिला प्रशिक्षक म्हणून आराध्या मकवाना प्रसन्ना गावडे यांनी काम पाहिले. पंच म्हणून शीतल खामकर मनाली बेटकर यांनी काम केलं.