राज्यस्तरीय तायकवोंदो स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग चा संघ जाहीर

तायकवाँडो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग या अधिकृत जिल्हा संघटने अंतर्गत सिंधुरत्न स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित जिल्हा ज्युनिअर व कॅडेट निवड चाचनी तांबे भवन हॉल, कलमठ, कणकवली येथे पार पडली.
कॅडेट व ज्युनिअर राज्य स्पर्धा मुंबई व रत्नागिरी येथे होणार असून निवड झालेली क्योरोगी व पुमसे टीम राज्य स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल.
निवड झालेली टीम
ज्युनिअर मुले – कु प्रणव कुडाळकर कु पंकज चव्हाण कु. अथर्व पाटील कु कुणाल नारकर कु तन्वीर तांबे
ज्युनिअर मुली – कु धनश्री परब कु. कोमल बांदेकर कु सोनिया ढेकणे कु प्रज्योती जाधव कु सृष्टी लाड
कॅडेट मुले – कु अर्णव कालगे कु रुद्र पाटील कु सोहम कुबल कु अथर्व तेली कु दीव्यांक कोरगावकर कु वेदांत धनवटे
मुली – कु हर्षाली राणे कु काव्या गवांडळकर कु संयुक्ताराजे आबदार कु दुर्वा गावडे
पूमसे – कु तनिष्का सावंत कु काव्या गवंडळकर कु सोनिया चोडणेकर कु राजलक्ष्मी कांबळे
स्पर्धेला पंच म्हणून अदिती मालपेकर , हुमेरा मंसुरी, जान्हवी बाक्रे, दिक्षा पारकर, भावना ठाकूर, ओंकार सावंत यांनी काम पाहिले. निवड झालेल्या संघाचे अध्यक्ष श्री संदेशजी पारकर उपाध्यक्ष श्रीमती राजश्री धुमाळे कोषाध्यक्ष श्री सुधीर राणे श्री विनायक सापळे श्री अमित जोशी श्री नितीन तावडे श्री संदीप सावंत श्री एकनाथ धनवटे श्रीमती जयश्री कसालकर आदींनी अभिनंदन केले आहे.