ठाकर समाजाचे जात वैध प्रमाणात प्रश्नी समाज बांधवांनी आम. नितेश राणेंनी भेट घेतली होती
अवघ्या काही तासांतच प्रश्न सोडवल्यामुळे आम. नितेश राणेंची भेट घेत आभार मानले..!
कणकवली I मयुर ठाकूर : सिंधुदुर्ग ठाकर समाजच्या पदाधिकाऱ्यांनी जात वैधता प्रमाणपत्राच्या समस्येबाबत आम. नितेश राणे यांची भेट घेतली होती. आम. नितेश राणे यांनी तात्काळ त्या पडताळणी समितीवरील उपायुक्त पावरा यांच्याशी संपर्क केला व त्यांच्याशी ठाकर समाजाच्या प्रश्नाबाबत बोलणं केलं. काही तासांमध्येच रखडलेली कामे सुरू केली व ठाकर समाजाला दिलासा दिला. त्यामुळे अनेकांचे शैक्षणिक प्रश्न, नोकरीचे प्रश्न मार्गी लागणार आहेत.
We consider the Thackeray community to be a community. Thanks to Nitesh Rane..!
आज ठाकर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी व समाज बांधवांनी प्रहार भवन येथे आम. नितेश राणे यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान रणसिंग, उपाध्यक्ष वैभव ठाकूर, कार्याध्यक्ष निलेश ठाकूर, सल्लागार नामदेव ठाकूर, भास्कर गंगावणे, गुढिपूर उपसरपंच सागर रणसिंग, आशिये माजी उपसरपंच प्रवीण ठाकूर, कार्यकारणी सदस्य साईनाथ यादव, उमेश ठाकूर, अच्युत मसगे, दीपक सिंगनाथ, स्वप्नील ठाकूर, निलेश गवाणकर, सचिन ठाकूर आदी. समाज बांधव उपस्थित होते.