माखजन इंग्लिश स्कूल येथे संगीत कक्षाचे शानदार उदघाटन

 

माजी विद्यार्थ्यांच्या गायनाने रसिक भारवले

माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल मध्ये भजनीभूषण कै.पांडुरंग सीताराम लघाटे संगीत कक्षाचे शानदार उदघाटन झाले.यावेळी कै.पांडुरंग लघाटे यांचे कुटुंबीय व अन्य मान्यवर उपस्थित होते.हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष आनंद साठे यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
माखजन पंचक्रोशीला संगीत कलेची एक वेगळी परांपरा आहे.हा सांगीतिक वारसा जपण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी या संगीत कक्षाचे भविष्यात मोलाचे योगदान लाभणार आहे.या संगीत कक्ष निर्मितीमुळे पंचक्रोशस्थ नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

दरम्यान या कार्यक्रमावेळी कै.पांडुरंग लघाटे यांचे सुपुत्र श्री सतीश लघाटे व श्री रमेश लघाटे यांच्या हस्ते फित सोडून संगीत कक्षाचे उदघाट्न करण्यात आले.त्यानंतर संस्था संचालक पराग लघाटे यांनी प्रस्ताविक केले.
कार्यक्रमावेळी मा.पं.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष आनंद साठे यांच्या हस्ते कै.पांडुरंग लघाटे यांच्या कुटुंबूयांचा यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री रमेश लघाटे यांनी मोनोगत व्यक्त केले .कै.पांडुरंग लघाटे यांची रचना सादर केल्या.

यावेळी अध्यक्ष आनंद साठे यांनी आपल्या मनोगतातून देणगीदारांचे आभार मानले.
या उदघाटन सोहळ्याचा उत्तरार्ध सांगितिक कार्यक्रमानी रंगला माखजन इंग्लिश स्कूल चे माजी विद्यार्थी प्रथमेश लघाटे,पराग लघाटे,प्रसन्न लघाटे,सुरज पाटणकर,संदेश पोंक्षे,आनंद लिंगायत,मिलिंद लिंगायत,आदित्य खरे आदिनी मिळून मैफिल रंगावली.कै.पांडुरंग लघाटे यांच्या स्वराचित रचना सादर केल्या.प्रथमेश लघाटे,पराग लघाटे,आणि संदेश पोंक्षे यांनी गायलेल्या गाण्यांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.या मैफिलीचे सूत्रसंचालन आदित्य सरदेसाई याने केले.या संगीत मैफिलीच्या सुरवातीला गुरुकुल पूरक उपक्रमातील मुलांनी कै.पांडुदादा लघाटे यांच्या रचनेवर आधारित दोन समूह गीते सादर केली.याची विशेष तयारी प्रशालेतील संगीत शिक्षक विशारद गुरव यांनी करून घेतली होती.यावेळी अपूर्वा खरे थत्ते हिने कै.पांडुदादा लघाटे यांच्या रचनेवर नृत्य सादर केले. गायन मैफिलीची श्री गजानन उर्फ बाबा लघाटे यांनी येतो देवा लोभ असो द्यावा या भैरवी ने केली.

या कार्यक्रमाला संस्था सचिव राजेश फणसे,उपाध्यक्ष मनोज शिंदे,संचालक विवेक केळकर,मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर,इंग्लिश मिडीयम च्या मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत कलांगण चे निबंध कानिटकर,श्रीनिवास पेंडसे,तसेच श्री दिलीप जोशी,माजी मुखायाध्यापक श्री सदाशिव बापट, श्री किशोर पाटकर,रवी राजपूत,भिकू किंजळकर आदिंसह मान्यवर ,पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव पोंक्षे यांनी केले तर आभार संस्था सचिव संदेश पोंक्षे यांनी मानले.