प्रथमच अशा त्रिनेत्र फंडस कॅमेऱ्याद्वारे डोळ्याच्या पडद्याची तपासणी
रत्नागिरी: इन्फिगो आय केयर हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील डोळ्यांच्या हॉस्पिटलचे सर्वात मोठे नेटवर्क आपल्या विविध नेत्रतपासणी उपक्रमाद्वारे डोळ्यांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी कटिबध्द असते.
एकंदरीतच आरोग्याबद्दल अनास्था व काहीशी बेफिकिरी यामुळे सर्व वयोगटातील व्यक्तिंना डोळ्याच्या व इतर शारीरिक समस्या आढळून येतात. ४० वर्षावरील सर्वांनी व विशेषतः ज्यांना डायबेटीस, ब्लड प्रेशर, स्थूलपणा व अधिक जास्त नंबर असलेला चष्मा आहे अशांनी डोळ्यामध्ये विशिष्ट औषधाचे थेंब घालून केली जाणारी डोळ्यांची अंतर्गत व पडद्याची तपासणी रेटिना नेत्रतज्ञांकडून करून घेतली तर दृष्टीची संभाव्य हानी व अवास्तव खर्च टाळता येवू शकतो.
डोळ्याचा अंतर्भाग व पडदा यांचा दिसण्यामध्ये सर्वात महत्वाचा सहभाग असतो. आपल्या जिल्हयामध्ये सुपरस्पेशालिटी रेटिना तज्ञ डॉ. प्रसाद कामत अशा व्यक्तींची तपासणी करणार असून ही सुविधा कोकणात इन्फिगोमध्येच उपलब्ध करून देण्यात आली आहे. डॉ. प्रसाद कामत हे सुप्रसिद्ध रेटिना स्पेशालिस्ट असून त्यांनी शंकर नेत्रालय, चेन्नई येथून प्रशिक्षण घेतले आहे आजपर्यंत त्यांनी २ लाखांहून अधिकांवर यशस्वी उपचार केले असून पडदा सरकणे, पडद्यावर रक्तस्त्राव अथवा सूज येणे व दृष्टी अचानक कमी होणे ही लक्षणे असणाऱ्यांना पुन्हा दृष्टी दिली आहे.
दि. २५, २६ जून रोजी इन्फिगो आय केयर हॉस्पिटल, गुलमोहोर पार्क खेड येथे व दि. २७ जून रोजी ‘इन्फिगो 3D आय क्लिनिक साई लॉज समोर, लांजा येथे व दि. २८ ते ३० जून २०२३ या काळात इन्फिगो आय केयर हॉस्पिटल, रत्नागिरी येथे डॉ. कामत नेत्रतपासणी करणार आहेत. सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन इन्फिगोचे व्यवस्थापकिय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले आहे.
यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक असून त्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. खेड – ९१३७१५५४९०, लांजा – ९३७२७६६५१०, रत्नागिरी – ९३७२७६६५०४