सोनू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त २७ नोव्हेंबर रोजी वरवडेत महाआरोग्य शिबीर

Google search engine
Google search engine

हृदयरोग, सर्जरी, ऑर्थो, बालरोग, नेत्ररोग, कान नाक घसा रोग, दंतरोग ची होणार मोफत तपासणी

कणकवली I संतोष राऊळ : भाजपा कणकवली तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सोनू सावंत मित्रमंडळाच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबीर २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान आयडियल इंग्लिश स्कुल वरवडे येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन कणकवली शहरातील जुन्या पिढीतील जेष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. सविता तायशेटे यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता केले जाणार आहे.

On the occasion of Sonu Sawant’s birthday on 27th November Maha Arogya Camp at Warwade

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या आरोग्य शिबिरात हृदयरोग तज्ञ डॉ. सूर्यकांत तायशेटे, डॉ. बी. जि. शेळके डॉ. राज मेनन यांच्याकडून तपासणी केली जाणार आहे. सर्जन तज्ञ डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. संदीप सावंत, डॉ. महेंद्र आचरेकर रुग्ण तपासणी करतील. ऑर्थो विभागाचे डॉ निलेश पाकळे, डॉ. शरण चव्हाण हे रुग्णांची मोफत तपासणी करतील. स्त्रीरोग तज्ञ ‘ए आर नागवेकर, डॉ अश्विनी नवरे, डॉ विशाखा पाटील रुग्ण तपासणी करणार आहेत. नेत्ररोग तज्ञ डॉ प्रसाद गुरव, डॉ राकेश बोरकर रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करतील. कान नाक घसा रोगतज्ञ डॉ श्रीपाद पाटील, डॉ प्रिता नायगावकर, डॉ ओंकार वेदक तसेच डेंटिस्ट डॉ स्वप्नील राणे, डॉ धैर्यशील राणे हे रुग्ण तपासणी करणार आहेत. या महाआरोग्य शिबिरात बिपी, प्लस, spo२ तपासण्या केल्या जाणार आहेत. तसेच hb%, ब्लड शुगर, युरिन मायक्रोउलबिमीन, hba1c या लॅब टेस्ट केल्या जाणार आहेत. रुग्णांची ecg तपासणी ही केली जाणार आहे. २० गरजू रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच १०० रुग्णांना मोफत चष्मेवाटप केले जाणार आहे. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन सोनू सावंत मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.