बंद झालेल्या एसटी सेवा कुडाळ-आंजिवडे गावात पूर्ववत सुरू झाल्या
भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे,विशाल परब यांनी दिला मदतीचा हात
माजी सभापती मोहन सावंत आणि भाई बेळनेकर यांच्या मेहनतीला यश
संतोष राऊळ ( शिवापूर) गेले कित्येक वर्षे माणगाव खोऱ्यात केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे व भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा करणारे,भाजपचे कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती मोहन सावंत आणि भाई बेळनेकर यांनी पुन्हा एकदा आपल्या समाजकार्याची प्रचिती आणून दिली आहे. कुडाळ तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेले आंजिवडे गाव आणि त्यात गावात सुरू असलेली एसटी बस रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बंद झाली. अखेर हा रस्ता स्थानिकांचे सहकार्य आणि भाजपाचे नेते विशाल परब यांच्या मदतीने तयार करून त्या रस्त्यावरून एसटी बस पूर्वक सुरू केली.गेले काही दिवस आंजिवडे गावाचा रस्ता खचल्याने एसटी सेवा बद झाली. लोकांना चालत जावे लागत होते. त्यांच्या हाकेला धावून जात. माजी.खाजदार निलेश राणे व भाजप चे युवा वेतृत्व विशाल परब यांच्या सहकार्याने ही लोकांची होणारी गैरसोय दूर केली गेली.त्यासाठी आंजीवडे गवळीवाडी व भाकरवाडी तील लोकांनी स्वतः काम करून या रस्त्यासाठी श्रमदान केले. त्यामुळे आज पुन्हा एखादा एसटी सेवा सुरू झाली आहे.
सत्तेत असो वा नसो,कमी तिथे आम्ही असे व्यक्तिमत्व असलेल्या सखाराम शेडगे ,संजय शेडगे . राजन गुरव.तसेच आंजीवडे गावाचे वासुदेव सकपाळ , मधुकर सकपाळ ,कृष्णा पंदारे,रामू कदम ,पोलीस पाटील नारायण पंदारे.तसेच राजा धुरी हे ही तिथे उपस्थित होते.