रत्नागिरी | प्रतिनिधी : स्वरूपानंद पतसंस्थेचा ठेव वृद्धीमास सुरु होवून आज ५ दिवस पूर्ण झाले असून यामध्ये एकूण रु.२ कोटी ८६ लाख ठेवी जमा झाल्या आहेत. जाणीवपूर्वक सर्वसमावेशक धोरण अवलंबून आपला जनाधार वाढला आहे. समाज रचनेतील प्रत्येक वर्गातील सभासद, ग्राहक स्वरूपानंद पतसंस्थेबरोबर निगडीत आहे. केवळ विश्वासार्ह अर्थकारण करणे, उपयुक्त कर्ज आणि ठेव योजना राबवणे ही आपली व्यावसायिक टॅगलाईन स्वरूपानंद पतसंस्थेने स्वीकारली आहे. समाजाच्या सर्व स्तरातले प्रदीर्घकाळ जोडलेले ग्राहक ही स्वरूपानंद पतसंस्थेच्या यशाची गुरुकिल्ली म्हणावी लागेल.
प्रत्येक ठेव वृद्धीमासात मोठ्या संख्येने ग्राहक सभासद पतसंस्थेशी जोडले जातात. मोठ्या प्रमाणावर ठेव गुंतवणूक पतसंस्थेकडे होते. २६६ कोटींच्या ठेवींचा टप्पा पार करत स्वरूपानंद पतसंस्थेला आता २७५ कोटींचा ठेव टप्पा खुणावत आहे.
सातत्याने जमा होणाऱ्या ठेवीमध्ये महिला ठेवीदारांचे प्रमाण ६२% आहे. मोठ्या प्रमाणावर महिला स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला गुंतवणुकीसाठी आपली पहिली पसंती देतात. महिलांना लक्ष्मीच रूप मानलं जातं याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात महिला ठेवीदार स्वरूपानंद पतसंस्थेशी निगडित आहेत. उत्तम विश्वासार्ह आर्थिक सेवा, आर्थिक शिस्त आणि कमालीची सुरक्षितता यामुळे स्वरूपांनंद पतसंस्थेकडे महिला वर्ग सातत्याने गुंतवणूक करण्यास उत्सुक असतो. एक प्रकारे महिलांचे आर्थिक सबलीकरण होत असल्याचे द्योतक म्हणून महिला गुंतवणूकदारांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे जाणवते.
दि.२० जून ते २० जुलै या चालू ठेव वृद्धीमासातही महिला वर्गासाठी अतिरिक्त व्याजाच्या योजना स्वरुपांजली ठेव योजना ८.२५% (१२ ते १८ महिने), सोहम ठेव योजना ८.५०% (मासिक व्याज) (१९ ते ३६ महिने) स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने घोषित केल्या आहेत.
या वर्षीही एकूण जमा होणाऱ्या ठेवींपैकी ६०% ठेव रक्कम महिला गुंतवणूकदारांनी गुंतवलेली रक्कम असेल असा विश्वास ॲड.दीपक पटवर्धन यांनी व्यक्त करत सर्वच गुंतवणूकदारांनी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करावी असे आवाहन केले आहे










