तात्काळ दखल सा.बां.कार्यकारी अभियंता सर्वगोड यांची
कलमठ-आचरा रस्त्यावरुन वाहणाऱ्या पाण्याची दखल.
कणकवली : कलमठ आचरा रोड वरील अनेक ठिकाणी पहिल्याच पावसात पाणी साचले होते.कलमठ कोरगांवकर दुकान, सुतारवाड़ी पारकर बिल्डिंग, लांजेवाड़ी शांतादुर्गा नगर, लांजेवाड़ी चव्हाण घर ते आइस फॅक्टरी, कलमठ कुंभारवाड़ी रस्ता अश्या अनेक ठिकाणी रस्त्यावरुन वाहत असलेल्या पावसाच्या पाण्याने वाहतूक करणे व चालणे कठीण झाले होते कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यानी पहिल्याच पावसात केलेल्या पाहणी नंतर फ़ोटो काढून सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड़ यांना व्हाट्सप केले काही वेळातच कार्यकारी अभियंता सर्वगोड़ यानी सरपंच संदीप मेस्त्री यांना फोन करून माहिती घेतली आणि काही वेळाने अभियंता पी.व्ही. कांबळे यानी जेसीबी आणि सार्वजनिक बांधकाम कर्मचारी यांच्या मदतीने कलमठ मधील काम सुरु केले असल्याचा फोन सरपंच संदीप मेस्त्री यांना केला. कार्यतत्पर अधिकारी म्हणून ओळख असलेल्या सर्वगोड़ यांचे आभार सरपंच यानी फोन करुन मानले असून कलमठ ग्रामस्थांमधुन समाधान व्यक्त होत आहे.