मृतांमध्ये 2 बालिकांचा सामावेश
दापोली | प्रतिनिधी : दापोली हर्णे मार्गांवरील आसूद जोशी आळी जवळील एका वळणावर दापोलीतून आंजर्ले कडे प्रवासी वाहतूक करणारी मँक्झिमो व दापोलीकडे येणारा ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत मँक्झिमो चालक अनिल (बॉबी) सारंग याच्यासह 7 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून यात 2 मुलांचा समावेश असून सर्व मृत प्रवासी पाजपंढरी जवळील अडखळ येथील आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी 2 वाजण्याचे सुमारास अनिल (बॉबी) हे त्यांची मँक्झिमो क्रमांक एम. एच.08.5208 हे दापोलीतून आंजर्लेकडे 14 प्रवासी घेऊन जात असताना त्यांची डमडम आसूद जोशी आळी नजीक असलेल्या वळणावर आली असता समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने बाहेरून टर्न मारल्याने मँक्झिमो ट्रकवर आदळली, ट्रॅकने डमडमला रस्त्याच्या डाव्या बाजूला घासत नेले, हा अपघात एवढा भयानक होता की मँक्झिमो मधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच दापोलीचे पोलिस निरीक्षक विवेक आहिरे यांनी पोलीस कर्मचारी व रुग्णवाहीका घेऊन अपघातस्थळी धाव घेतली. या अपघातात अनिल सारंग चालक वय 45 रा. हर्णे, संदेश कदम 55, स्वरा संदेश कदम-8, मारियम काझी- 6, फराह काझी, 27, शारय्या शिरगांवकर सर्व रा. अडखळ तर मीरा महेश बोरकर, वय 22, रा. पाडले,वंदना चोगले वय 34 रा. पाजपंढरी यांचा मृत्यू झाला आहे.
तर सपना संदेश कदम वय 34, रा. अडखळ, श्रद्धा संदेश कदम, वय 14, रा. अडखळ, विनायक आशा चोगले, रा. पाजपंढरी, भूमी सावंत वय 17, मुग्धा सावंत वय 14, ज्योती चोगले वय 9 रा. पाजपंढरी यांच्यावर उपजिल्हा व तर काहि जखमींना मुंबई येथे हलविण्यात आले आहे.
अनेक जण बचावकार्यात दाखल
अपघाताची माहिती मिळताच दापोली मधील मानाची गणपती च्या रुग्णवाहिका, 108 ची रुग्णवाहिका, स्वस्तिक रुग्णवाहिका इतर खाजगी रुग्णवाहिकेने तात्काळ धाव घेत बचाव कार्य सुरु केले. यामध्ये दापोली मधील अनेक मंडळे, सामाजिक कार्यकर्ते आदींनी रुग्णांना गाडीतुन बाहेर काढण्याचे काम केले.
अडखळ, हर्णे, पाजपंढरी तसेच दापोलीकरांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
अपघात घडताच ट्रक चालक व क्लीनर यांनी अपघात स्थळावरून पळ काढला, त्यांचा शोध दापोली पोलीस घेत आहेत. या अपघातात अडखळ येथील कदम कुटुंबातील 2 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत.
ओव्हरलोड वाहतूक
6 प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी असताना तब्बल 14 प्रवासी भरून ही मँक्झिमो आंजर्लेकडे जात होती.
उपजिल्हा रुग्णालयाची कार्यतप्तरता
या अपघाताची माहिती मिळताच कार्यतप्तर दापोली उपजिल्हा रुण्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश भागवत यांनी घडलेल्या अपघाताची भिषणता पाहुन आपल्या सर्वच स्टाफला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात हजर राहण्याचे आदेश काढले. डॉ. वैश्षणी भावे, डॉ. नागेश, डॉ. प्रदिप बनसोडे, लँब टेक्निशियन श्री. गिते, एक्सरे टेक्निशियन श्री. हेमंत नाईक व श्री. मयुर पारधे, सौ. घाग (परिसेविका), सौ. जाधव (परिसेविका), सौ. हांडे, सौ. प्रिया वंडकर, सौ. गायत्री भाटकर, दिपिका नांदगांवकर, अर्चना वसावे, निकिता घुगरे, आदी अधिपरिचारिका तसेच श्री. कांबळे, श्री.धोत्रे, श्री.वाघवे, श्री. चाळके, श्री. तेवरे आदी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आणि रामराजे नर्सिंग काँलेजचे विद्यार्थीनी जखमींवर उपचार करण्यास मदत केली.