कुंभवडे येथे विवाहितेचा नदी पात्रात बुडून मृत्यू

 

कणकवली ( वार्ताहर)
तालुक्यातील कुंभवडे खिर्लाचीवाडी येथील लाविना आंतोन डीकोष्टा ( ३१ ) या विवांहितेचा मल्हारी नदी पात्रात सोमवारी दुपारी ११ .३० च्या सुमारास बुडून मृत्यू झाला. ती आंघोळीसाठी गेली होती. तिच्या सोबत एक अपंग मुलगी होती. ही मुलगी नदीकिनारी बसली होती. आंघोळीसाठी नदी पात्रात उतरलेल्या लविना डीकोष्टा हिला पाण्याच्या अंदाज न आल्याने तिचा बुडून मृत्यू झाला.