देव्या सूर्याजी यांचा आरोग्य प्रशासनाला इशारा
सावंतवाडी । प्रतिनिधी: उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी ही केवळ दोन जणांच्या जीवावर सूरु आहे. पदभरती करणं आवश्यक असताना केवळ दोघांच्या जीवावर ही ब्लड बँक चालू आहे. वारंवार निवेदने देऊन इशारे देऊन देखील पदभरती केली जात नाही आहे. गेले ६ महिने लक्ष वेधून, पत्रव्यवहार करून प्रशासन दखल घेत नाही आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पद न भरल्यास जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयाबाहेर आत्मदहन करू असा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिला. सोमवारी काळी फीत बांधून रक्तदात्यांनी उपजिल्हा रुग्णालयाबाहेर आरोग्य प्रशासनाचा निषेध नोंदवला.
यावेळी देव्या सुर्याजी म्हणाले,सावंतवाडीची ब्लड बँक बंद करण्याचा घाट प्रशासन आखत आहे. सोमवार पर्यंतची मुदत देऊन देखील कोणतीही हालचाल प्रशासनाऩ केली नाही.त्यामुळे आज जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य प्रशासनाचा आम्ही निषेध करत आहोत. सावंतवाडी रक्तपेढीत एक तरी अधिकचा टेक्निशियनची भरती न झाल्यास तालुक्यातील रक्तदात्यांसह जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयाबाहेर आत्मदहन करू असा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिला. तर गरजेच्या वेळी आम्ही रक्तदाते सामाजिक बांधिलकी जपत पुढे येतो. पण, जोवर पदभरती होत नाही तोवर आम्हाला देखील रक्तदान करताना विचार करावा लागेल अन् याला सर्वस्वी जबाबदार जिल्हा आरोग्य प्रशासन राहिलं असं मत व्यक्त केले.
युवा रक्तदाता संघटनेन सोमवारी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासमोर हाताच्या दंडावर काळी फीत बांधून निषेध चे बोर्ड दाखवून वैद्यकीय प्रशासनाचा व सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सकांचा त्यांनी निषेध करत आंदोलन छेडलं. यावेळी गौतम माठेकर, अर्चित पोकळे, सामाजिक बांधिलकी चे रवी जाधव, संदीप निवळे, राजू धारपवार, सुरज मठकर, प्रतिक बांदेकर, वसंत सावंत, प्रथमेश प्रभु, दीपक धुरी, देवेश पडते,साईश निर्गुण आदी उपस्थित होते.