सोशल मीडिया वरून फसवणूक करणारा ओरिसा येथील आरोपी गजाआड

Google search engine
Google search engine

निवती पोलिसांची कारवाई : निवती मेढा येथील तरुणाला 5 लाख रुपयांना घातला गंडा

 

 

वेंगुर्ले : दाजी नाईक

फेसबुक व्हाँटसप मीडिया वरुन ओळख करून शेअर बाजार बाबत माहिती दिली आणि पैशाचे आमिष दाखऊन निवती मेढा येथील तरुणाला ओरिसा येथील एका तरुणाने 5 लाख रुपयांना गंडा घातला. या गुन्ह्यातील संशय आरोपी जोयेश कुमार शाहु वय 20 वर्षे रा.वसंत विहार, बुरला जिल्हा संबलपुर, राज्य ओरिसा याला निवती पोलिसांनी तेथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे.

निवती पोलिस ठाण्या तून आज देण्यात आलेल्या माहिती मध्ये कलम ४२० सह आयटी कायदा कलम ६६(डी) नुसार पार्थ शाम सारंग रा. निवती मेढा यांने दिलेल्या तक्रारी वरुन जुलै 2022 मध्ये निवती पोलीस ठाणे येथे हा गुन्हा दाखल झाला होता. यातील आरोपीत जोयेश कुमार शाहु वय 20 वर्षे रा वसंत विहार बुरला जिल्हा संबलपुर राज्य ओरिसा याने पार्थ सारंग याचे शी फेसबुक व्हाँटसप मीडिया वरुन ओळख करून आपणास शेअर बाजार बाबत माहिती असुन आपण शेअर बाजारात पैसे गुंतवणूक केली की जास्त पैसे मिळतील असे सांगितले. तसेच आरोपीत यांने फिर्यादीला आर्थिक फायद्याचे आमिष दाखविले म्हणून त्याचे वर विश्वास ठेवून आरोपीत सांगेल त्या प्रमाणे आरोपीचे बँक अकाउंट वर फिर्यादी ने पाच लाख रुपये भरले. त्या नंतर पार्थ सारंग याची आरोपीत जोयेश कुमार शाहू यांने फसवणूक केल्याचे लक्षात आलेवर पार्थ शाम सारंग याने निवती पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

दरम्यान सदर आरोपितांचा शोध घेण्यासाठी व तपास करणे कामी प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक एस. आर.राणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवती पोलिस ठाणे चे पोलिस उपनिरीक्षक संकेत पगडे, सोबत पोलीस हवालदार प्रदिप गोसावी व पोलीस हवालदार विक्रांत तुळसकर यांचे पथक नेमले होते. सदरच्या पथकातील अंमलदार यांनी ओडिसा येथे जावुन बुरला पोलीस ठाणे संबलपूर ओरीसा येथील पोलीसांची मदत घेवून आरोपीत याचा त्याचे घरी शोध घेतला. प्रथम आरोपीत याचे घरातील लोकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली नंतर संकेत पगडे पोलीस हवालदार प्रदिप गोसावी, विक्रांत तुळसकर यांनी पोलीस कौशल्य वापरून व बुरला पोलीसांनी गोपनीय माहिती काढली असता आरोपी जोयेश कुमार शाहू बाजुला लपुन बसल्याचे समजले. त्या वेळी तेथे जावुन आरोपीत यांस ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून निवती पोलीस ठाणे येथे आज घेऊन आले आहेत.

सदरचे कामगीरी बाबत पोलीस अधीक्षक श्री सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे, उप विभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी श्रीमती रोहिणी सोंळुखे, पोलीस निरीक्षक श्री सुनील राणे यांनी तसेच प्रभारी सदर पथकाचे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्री टी. ए. सय्यद यांनी कौतुक केले आहे.

Sindhudurg