पाण्याचा पंप चोरी करताना युवक ताब्यात

मळगाव येथील घटना : गुन्हा दाखल

सावंतवाडी । प्रतिनिधी :

मळगाव येथील शेत विहिरीतील पाण्याचा पंप चोरी करताना कोलगाव येथील एकाला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दत्तप्रसाद द्वारकानाथ कालेलकर रा. कोलगाव असे संशयिकाचे नाव आहे संबंधित शेत घराचे मालक राजेंद्र मोर्ये यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलीस ठाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील करीत आहे.

अधिक माहिती अशी की,मळगाव कुंबारली येथे श्री मोरये यांचे शेत घर आहे त्याच्या बाजूला असलेल्या विहिरी त शेत पंप होता. तो संशयित चोरी करत असताना तेथील काही ग्रामस्थांनी त्याला पाहिले व सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात घेतले.पंप २५०० रुपये किमतिचा आहे. त्यानुसार मोरया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sindhudurg